vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयेआर्थिक वर्ष अखेरीस सुट्टीच्या दिवशीही सुरू- मुद्रांक जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे-जिरंगे 

जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयेआर्थिक वर्ष अखेरीस सुट्टीच्या दिवशीही सुरू- मुद्रांक जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे-जिरंगे

            सांगली, प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील सर्व सह दुय्यम निबंधक, दुय्यम निबंधक कार्यालये दि. 29 ते 31 मार्च 2025 या आर्थिक वर्ष अखेर असलेल्या सुट्टीच्या दिवसात सुरू ठेवण्यात येत असून सर्व प्रकारचे दस्त नोंदणीचे कामकाज चालू ठेवण्यात येत आहे. या संधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे- जिरंगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. सन 2024- 2025 हे आर्थिक वर्ष संपत येत असल्याने वार्षिक बाजारमूल्य दर तक्ते दरवर्षी 1 एप्रिल रोजी प्रसिद्ध होत असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयात मार्च महिन्यात दस्त नोंदणीसाठी पक्षकारांची गर्दी होत असते. महत्त्वाच्या सणामुळे देखील दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची गर्दी वाढत आहे. यास्तव नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी आर्थिक वर्ष 2024-2025 या वर्षातील इस्टांक पूर्ण करण्याच्या दृष्टीने 29 ते 31 मार्च 2025 या आर्थिक वर्ष अखेर असलेल्या सुट्टीच्या दिवसात सर्व दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ऊस उत्पादकता वाढ प्रकल्प राबवा- पालकमंत्री शंभूराज देसाई

विधानसभा लक्षवेधी सूचना :बीड जिल्हा रुग्णालयातील कोविड काळातील भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांना निलंबित करण्यात येणार- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

अर्थसंकल्पात शैक्षणिक प्रगतीला ब्रेक-आमदार सुधाकर अडबाले

पंतप्रधानांच्या शुभहस्ते २० जूनला ‘पी.एम. किसान’च्या २३ व्या हप्त्याचे वितरण देशभरात साजरा होणार ‘किसान उत्सव दिवस’

संविधान जागृती प्रश्नमंजुषा’ उपक्रमाच्या नोंदणी प्रक्रियेला २५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर करु नये – जिल्हाधिकारी अशोक काकडे