vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

विमल दिवस निमित्ताने मुंबई विद्यापीठ कलिना परिसरात विविध कार्यक्रम-राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर लिखित रश्मिरथी नाटकाचा प्रयोगअर्चना शंभरकर याच्या हिंदी पुस्तकाचे होणार लोकार्पण…

विमल दिवस निमित्ताने मुंबई विद्यापीठ कलिना परिसरात विविध कार्यक्रम-राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर लिखित रश्मिरथी नाटकाचा प्रयोगअर्चना शंभरकर याच्या हिंदी पुस्तकाचे होणार लोकार्पण…

 

मुंबई प्रतिनिधी: सुप्रसिद्ध लेखिका, सामाजिक कार्यकर्ता, सजग विचारवंत प्रा. विमलताई गाडेकर यांच्या स्मृती दिनी होणा-या ‘विमल दिवस’ या कार्यक्रमा निमित्ताने राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर लिखित सुप्रसिद्ध हिंदी नाटक ‘रश्मिरथी’ याचा प्रयोग होणार आहे.जेष्ठ हिंदी नाट्य आणि सिने कलावंत राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे स्नातक हरीश हरिऔध हे नाट्य मंचन करणार आहेत. तसेच श्रीमती अर्चना शंभरकर यांच्या ‘सरिनास स्टोरी बोर्ड’ या हिंदी कथा संग्रहाचे लोकार्पण होणार आहे.

रविवार दि. 30 मार्च रोजी मुंबई विद्यापीठ विद्यानगरी परिसरातील कवी कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य भवन येथे संध्याकाळी चार वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. मुंबई विद्यापीठातील संज्ञापन व पत्रकारिता विभाग आणि विमलताई गाडेकर स्मृती सोहळा समितीच्यावतिने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे

  विमलताई गाडेकर यांच्यावर प्रेम करणारे राज्यभरातील त्यांचे चाहते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यात साहित्यिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, उच्चपदस्थ अधिकारी, डॉक्टर, सिनेसृष्टीतील मान्यवर यांच्यासह विद्यापिठातील प्राध्यापक गण आणि निवडक विद्यार्थी यांचा समावेश असणार आहे.

महाभारताच्या पार्श्वभूमीवर सामाजिक परिस्थीतीवर भाष्य करणा-या अजरामर आशा या राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या ‘रश्मिरथी’ या अभिजात नाट्याचे श्री हरीश हरिऔध हे प्रभावी प्रस्तुतीकरण करणार आहेत.संगीत प्रकाशयोजना आणि चैतन्यपुर्ण अभिनयाचे हे नाट्य असणार आहे.

लेखिका श्रीमती अर्चना शंभरकर यांच्या ‘सरिनास स्टोरी बोर्ड’ या कथा संग्रहाचे प्रकाशन शब्द विश्व साहित्य संम्मेलन, सिंगापूर येथे झाले आहे. मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर आणि जेष्ठ साहित्यिक रजिया सुलताना यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले असून, भारतात पहिल्यांदा या कथा संग्रहाचे लोकार्पण होणार आहे.

(स्मृतीशेष प्रा. विमलताई गाडेकर यांचा या वर्षी चतुर्थ स्मृती दिवस आहे. यानिमित्ताने रविवार दिनांक 30 मार्च 2025 रोजी ‘विमल दिवस -4’ चे आयोजन मुंबई येथे करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे स्वरुप असे आहे, प्रा. विमलताई गाडेकर यांच्या आठवणींना उजाळा, प्रा. विमलताई गाडेकर यांच्या वरील ध्वनीचित्रफीत प्रदर्शन, ‘विमलताईंचा अभिमान- गौरवोल्लेख सन्मान’, अर्चना शंभरकर लिखित ‘सरिनास-स्टोरी बोर्ड’ या हिंदी कथासंग्रहाचे लोकार्पण, राष्ट्र कवी रामधारी सिंह दिनकर यांनी रचलेल्या ‘रश्मी रथी’ या हिंदी काव्य नाट्याचे नाट्यकर्मी श्री. हरिश हरिऔध द्वारा प्रस्तुतीकरण.)

    सदर कार्यक्रमासाठी प्रवेश विनामुल्य असून रसिकांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन सिने कलावंत जयंत गाडेकर आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या प्रभारी उपसंचालक (विभागीय माहिती कार्यालय, कोकण विभाग) श्रीमती अर्चना शंभरकर यांनी केले आहे.यापुर्वी झालेले विमल दिवसप्रा. विमलताई गाडेकर यांच्या प्रथम स्मृती दिनी चंद्रपूर येथे प्रा. विमलताई गाडेकर यांचे अप्रकाशित साहित्य ‘कोवळे कंच’ आणि त्यांच्या आठवणी जागविणारे ‘ विमल ताई गाडेकर-व्यक्ती आणि वाङ्‌मय’या दोन संग्रहांचे प्रकाशन आणि निमंत्रीतांचे कवि संम्मेलन आयोजित केले होते.

 द्वितीय स्मृती दिनी रविवार दि. 26 मार्च 2023 रोजी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी,(रवींद्र नाट्य मंदिर), मिनी थिएटर मुंबई येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या दिवशी मान्यवरांच्या उपस्थितीत विमलताईंच्या कार्यांचे स्मरण करण्याबरोबरच, प्रा. विमलताई गाडेकर लिखित माता रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ‘चंदनी दरवळ’ या अभिनाट्याचे सादरिकरण झाले होते .प्रा. विसुभाऊ बापट यांचा विश्व विक्रमी जागतिक एकपात्री काव्यनाट्यानुभव ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ हा कार्यक्रम देखील सादर झाला होता.

मुंबई विद्यापीठ कलिना परिसर जे. पी. नाईक सभागृह येथे तृतिय ‘विमल दिवस- 2024’ चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात चित्रपट सृष्टीतील गीत, कथा लेखन या विषयावर प्रख्यात सिने साहित्यिक श्री. स्वानंद किरकिरे यांच्या सोबत दिलखुलास गप्पांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 विमलताईं विषयी…विदर्भातील सुप्रसिद्ध कवयित्री प्रा. विमलताई गाडेकर या चंद्रपूर येथील जनता महाविद्यालयात समाज शास्त्र विषयाच्या प्राध्यापक होत्या. त्यांचे आता पर्यंत अनेक कविता संग्रह आणि कथा संग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या साहित्यावर गोंडवाणा विद्यापिठातील काही विद्यार्थी पी एच डी करित आहेत. आंबेडकरी साहित्यात त्यांच्या साहित्याचा आणि कार्याचा नेहमीच आदराने उल्लेख केला जातो. महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक उत्थानासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले.

विमलताईंचा अभिमान- गौरवोल्लेख सन्मानस्मृतिशेष प्रा. विमलताई गाडेकर यांच्या आदर्शांना, आशिर्वादांना, शिकवणुकींना सार्थसिद्ध झाल्या बद्दल आतापर्यंत मानपत्र बहाल करण्यात आलेले मान्यवर असे आहेत, केंद्र शासनातील वरिष्ठ अधिकारी श्री. निखील मेश्राम, इंजिनियर श्रीमती अर्चना राणे -चोपडे, जनसंवाद विभाग प्रमुख डॉ. सुंदर राजदीप, नाट्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मंगेश बनसोडे आणि सिने कलावंत भारत गणेशपुरे.

0000

संबंधित पोस्ट

नाफा मराठी चित्रपट महोत्सव २०२५उत्सवी वातावरणात संपन्न!अमेरिकन मराठी प्रेक्षकांनी मराठी चित्रपटांचा मनमुराद आनंद घेतला! पुढील वर्षी नव्या उत्साहात, आणि अधिक देशांमध्ये ‘नाफा’ कार्यरत करण्याचा संकल्प”….

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी  झालेआई-बाबा…

देवा’ चित्रपटातील ‘भासद माचा’ हे धमाकेदार गाणे रिलीज, ३१ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित..

vishwatmaklokswamivarta

बहुचर्चित “उदयपूर फाइल्स’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला

महाभारत या लोकप्रिय मालिकेत कर्ण ही भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगाने निधन…

vishwatmaklokswamivarta

माध्यमांसाठी शेवटची संधी: 56 व्या इफ्फीसाठी माध्यम अधिस्वीकृती पोर्टल 17 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत पुन्हा उघडले..

vishwatmaklokswamivarta