vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींचा सुधारित प्रस्ताव तयार करावापाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश…

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींचा सुधारित प्रस्ताव तयार करावापाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश…

राज्य प्रतिनिधी- महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्च २०१७ च्या मंत्रिमंडळ निर्णयानुसार शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला आहे. याबाबतचा शासन निर्णयही जारी झाला, मात्र वेतन आणि भत्त्यांबाबत शासन निर्णयात शासनाने दायित्व स्वीकारूनही थकीत वेतन व वेतनश्रेणी नुसार विहित भत्ते मिळत नाहीत. यामुळे त्यांच्या सेवाविषयक बाबी, वेतन आणि भत्त्यांबाबत सुधारित प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले

मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री श्री. पाटील बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, संचालक (वित्त) सीताराम काळे यांच्यासह विधी व न्याय, सामान्य प्रशासन, वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, जीवन प्राधिकरणातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेचा दर्जा देण्याबाबत शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला होता. सामान्य प्रशासन, वित्त विभागाने यावर दर्जा दिला म्हणजे ते शासकीय कर्मचारी ठरत नसल्याचा अभिप्राय दिल्याने त्यांच्या सेवाविषयक बाबी, वेतन-भत्त्याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. निवृत्ती कर्मचाऱ्यांना सर्व लाभ मिळाले, मात्र सेवेतील कर्मचाऱ्यांना लाभ देण्यासाठी वित्त विभाग, विधी व न्याय आणि सामान्य प्रशासन विभागाने सकारात्मक निर्णय घेवून विषय मार्गी लावावा. काही कर्मचाऱ्यांना वेतन-भत्त्यांपासून डावलणे योग्य होणार नसल्याने वित्त विभागाने यावर तोडगा काढून निर्णय घ्यावा. घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता पाचव्या वेतन आयोगानुसार मिळत असल्याने ७ व्या वेतन आयोगानुसार मिळण्याबाबतही सहानुभूतीपूर्वक निर्णय घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

प्रधान सचिव श्री. खंदारे यांनीही वेतन व भत्त्याबाबत शासनाने दायित्व स्विकारल्यामुळे त्यानुसार वित्त विभागाने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

0000000

संबंधित पोस्ट

बनावट भन्ते म्हणून फिरणार्‍या कश्यपली वर कारवाई करण्याची भिख्खू संघ आणि बौध्द समाजाची मागणी; अप्पर पोलीस अधिक्षक यांची घेतली भेट..

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचा चांदूर रेल्वे उपविभाग दौरा;’माझी सुंदर शाळा’ अभियान, सूतगिरणी व रोपवाटिकेची पाहणी

कोल्हापूरच्या पर्यटन वैभवात कागलच्या पर्यटन व नौकायन केंद्रामुळे भर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण

महाबोधी बुद्ध विहार मुक्तीसाठी पंचशिल धम्म ध्वज यात्रा आज जालन्यात नागपूर ते चैत्यभुमी दरम्यान पू.भन्ते विनाचार्य साधणार जनसंवाद

विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

vishwatmaklokswamivarta

इंडिगो आणखी अडचणीत– 5 वर्षांपूर्वीचं कोट्यवधींचं प्रकरण समोर, नोटिस जारी

vishwatmaklokswamivarta