vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आदिवासी विभागाच्या योजनांमध्ये महिलांना प्राधान्य द्या – मंत्री डॉ. अशोक वुईके

आदिवासी विभागाच्या योजनांमध्ये महिलांना प्राधान्य द्या – मंत्री डॉ. अशोक वुईके

 

मुंबई, प्रतिनिधी -आदिवासी विभागाच्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ महिलांना आणि शालेय विद्यार्थ्यांना व्हावा, यासाठी या घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करावे, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले.

 

आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत आदिवासी विभागाकडील योजनांचा आढावा घेतला. या बैठकीस आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, विभागाच्या आयुक्त लीना बनसोड तसेच इतर संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

मंत्री डॉ. वुईके म्हणाले, आदिवासी महिलांचे सक्षमीकरण होणे गरजेचे असून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वतंत्र महिला बचत गट तयार करण्यात यावेत. ज्या गटांमध्ये आदिवासी महिलांचा सहभाग अधिक आहे, अशा गटांना योजनांचा प्राधान्याने लाभ द्यावा. सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षासाठी आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांना मंजुरी देण्यात आली असून या योजनांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचावा यासाठी शबरी आदिवासी महामंडळात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

येत्या १६ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू होत असून पहिल्या दिवशी शासकीय आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित रहावे. त्यासाठी आश्रमशाळानिहाय अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात यावी. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी पालक अधिकारी नियुक्त करावेत, तसेच १०० टक्के निकाल देणाऱ्या शाळांना व गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यासाठी विशेष योजना राबवण्यात यावी, असेही मंत्री डॉ. वुईके यांनी यावेळी सांगितले.

मंत्री डॉ. वुईके म्हणाले, शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून हेल्थ कार्ड तयार करण्यात यावे. तसेच वसतिगृह समित्यांची स्थापना करून व्यवस्थापन अधिक प्रभावी करावे. शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना पूर्णपणे पारदर्शकता पाळावी, अशा सूचना मंत्री डॉ. वुईके यांनी यावेळी दिल्या.

०००

संबंधित पोस्ट

मराठवाडा विभागस्तरीय ७० व्या कामगार नाट्य स्पर्धा-प्राथमिक फेरीचे पारितोषिक वितरण उद्या(दि.१५)

vishwatmaklokswamivarta

प्रांतीय अस्मितेसह अखिल भारतीय अस्मिता जपूयात – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन नागपूर येथील विविध तमिळ संस्थांच्यावतीने राज्यपालांचा सन्मान

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते एईडी डीफ्रेबिलिटर्स, स्टेमी उपकरणांचे लोकार्पण जागतिक हृदय दिनानिमित्त मंत्रालयात कार्यक्रम..

vishwatmaklokswamivarta

पायाभूत सोयी सुविधा प्रकल्पाजवळील शासकीय जमिनींवरआर्थिक केंद्र विकसित करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्सोवा ते भाईंदर सागरी किनारा उत्तरवाहिनी रस्त्याच्या कामाचा आढावा

पैठण तालुक्यातील शेतरस्त्यांच्या प्रकरणांची दि.७,१५ व २१ रोजी सुनावणी…

अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेता यंत्रणांनी अधिक अलर्ट राहावे ‘जिल्हाधिकारी किशन जावळे