vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेप्रदेश

शेतीच्या व्यवहरातुन फसवणूक केल्या प्रकरणाी तालुका पोलीस स्टेशन येथे 420 चा गुन्हा दाखल

शेतीच्या व्यवहरातुन फसवणूक केल्या प्रकरणाी तालुका पोलीस स्टेशन येथे 420 चा गुन्हा दाखल

जालना/प्रतिनीधी – शेतीच्या व्यवहारातुन शेख जमीलूद्दीन शेख अमिरुद्दीन यांच्या फिर्यादीरुन तालुका जालना पोलीस स्टेशन येथे 420, 34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, आरोपी विरजी जस्सा वागडीया, प्रदिप शरद पाटिल, विश्वास नागनाथराव भोर, नलीणी शरद पाटिल, नंदकिशोर तुकाराम गव्हाणे यांच्या कडुन मौजे इंदेवाडी जालना शिवारातील येथील शेत गट नं 74 मधिल एक हेक्टर 43 आर शेत जमीन खकम दोन कोटि पंचवीस लाख रूपया मध्ये विक्री करण्याचा करार दि. 17/12/2022 रोजी केला आणी आमच्या कडुन इसार रक्कम 56,25,000/- घेवुन आमच्या हक्कात विक्रीचा करारनामा / ईसार पावती अँड आर. बी मोरे जालना यांच्या समक्ष दि. 17/12/2022 रोजी वेळ दुपारी 03.00 वा सुमारास ईसार पावती करून रक्कम स्विकारली तेव्हा विक्री जमीनी संबंधी महसुल मंत्री मंत्रालय मुंबई येथे प्रकरण प्रलंबित असल्याचे त्यांनी आम्हाला सांगीतले आणी सदर प्रकरणाचा निकाल स्वतः च्या बाजुने लावुन घेण्याची जबाबदारी त्यांची असल्याचे देखील त्यांनी आम्हाला सांगीतले सदरचे प्रकरण अद्यापही मा. महसुल मंत्री मंत्रालय मुंबई येथे प्रलंबित आहे आणी हि बाबत त्यांना माहिती आहे तरी देखील आमची आर्थिक लुबाडणुक व फसवणुक करण्याच्या दृष्ट हेतुने त्यांनी दि 29/05/2024 रोजी आम्हाला कोणतीही माहिती न देता अंधारात ठेवुन बनावट कागदपत्राच्या आधारे सदरची शेत जमीन सौ संगीता अशोक अग्रवाल, राहुल किशोर अग्रवाल, सौ निकीता राहुल अग्रवाल, आशोक सुरजमल अग्रवाल यांच्या नावाने विक्री पत्र 2427/2024-2428/2024-2023/2024-2029/2024 अन्वये नोंदवुन दिली व अर्थिक लुबाडणुक व फसवणुक केली आहे.

फसवणुक केल्या प्रकरणी 1) विरजी जस्सा वागडीया रा. संभाजी नगर जालना 2) प्रदिप शरदराव पाटिल रा. छ. संभाजी नगर 3) विश्वास नागनाथराव भोरे रा. भाग्यनगर जालना 4) नलीणी शरद पाटिल रा. छ. संभाजी नगर 5) नंदकिशोर तुकाराम गव्हाणे रा. घनसावंगी जालना यांच्या वर तालुका पोलीस स्टेशन जालना येथे भादवी कलम 420 व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढिल तपास पोलीस निरीक्षक उनवणे हे करीत आहेत.

संबंधित पोस्ट

धनादेश अनादर प्रकरणांसाठी १८ जुलै रोजी विशेष लोकअदालत

लातूर ग्रामीणच्या विकासपर्वाचे शिल्पकार आदरणीय आमदार श्री. रमेशअप्पा कराड साहेब यांचा अभिष्टचिंतन सोहळा…👏🏻🎂🎊

वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे यांचा जालना दौरा भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद बैठक

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती भवनात ‘आरएसएस @१०० : अ सेंच्युरी ऑफ सर्व्हिस, युनिटी अँड सॅक्रिफाइस’ या पुस्तकाचे प्रकाशन केले. 

मिरवणूकांच्या अनुषंगाने सांगली पोलीस दल सतर्क जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त तैनात..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र सदनात सूर-संगम संगीतमय कार्यक्रम गणेशोत्सवात मराठी संस्कृतीचा जागर

vishwatmaklokswamivarta