vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते’शिक्षणवेध २०४७’ त्रैमासिकाचे प्रकाशन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते’शिक्षणवेध २०४७’ त्रैमासिकाचे प्रकाशन

 

मुंबई, प्रतिनिधी: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू असून या धोरणाच्या माध्यमातून नवकल्पना आणि संशोधनास अधिक चालना देण्यात येत आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने ‘शिक्षणवेध २०४७’ हे त्रैमासिक सुरू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी या त्रैमासिकाचे प्रकाशन करण्यात आले.या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्रिमंडळातील सदस्य, मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी उपस्थित होते.

‘शिक्षणवेध २०४७’ त्रैमासिकाच्या माध्यमातून विभागाच्या विविध योजना, उपक्रम, धोरणे, यशोगाथा, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे विचार, यशस्वी विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायी कथा तसेच शैक्षणिक क्षेत्रातील नवप्रवृत्तींचाही समावेश असणार आहे. तसेच तंत्रशिक्षण, उच्च शिक्षण, कला शिक्षण आणि ग्रंथालय संचालनालय या विभागांची एकत्रित माहिती वाचकांना उपलब्ध होणार आहे. शिक्षणवेध त्रैमासिक विद्यार्थ्यांसह प्राध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील सर्व संबंधितांसाठी प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरेल.

0000

संबंधित पोस्ट

केरा व मणदुरे उपसासिंचन योजनेचा आराखडा तयार होतात प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल- पालकमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

एकाच दिवशी 400 जणांना नियुक्तीचे आदेश*अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे*लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा…

नवप्रविष्ठ महिला पोलीस शिपाई प्रशिक्षणार्थींचेतुरची येथे सोमवारी दीक्षांत संचलन…

vishwatmaklokswamivarta

नशामुक्त छत्रपती संभाजीनगरःमानवी साखळीद्वारे जनजागृतीनशामुक्त जीवनासाठी संकल्प करु या – जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

*लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ-लालबागचा राजाचे, प्रथम दर्शन घ्यावा दर्शनाचा लाभ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया!! दर्शनाचा लाभ सर्वांसाठी प्रसिद्धी माध्यमांसाठी सदरचे live प्रक्षेपण आमच्या या- https://vishwatmaklokswamivarta.com/ वेबसाईट लिंक पहा

मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधीत आदेश

vishwatmaklokswamivarta