vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम मोहीमे मध्ये जालना उप प्रादेशिक परिवहन कार्यालय राज्यामध्ये द्वितीय

कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम मोहीमे मध्ये जालना उप प्रादेशिक परिवहन कार्यालय राज्यामध्ये द्वितीय

 

जालना, प्रतिनिधी): शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून योजनांचा लाभ उपलब्ध करून देत शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम राज्यस्तरावर राबविण्यात आली. या मोहिमेतील दूसऱ्या टप्प्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जालना यांनी कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमे अंतर्गत राज्यात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.

राज्य शासनामार्फत प्रशासकीय कामकाजात गतीशिलता, पारदर्शकता आणि लोकाभिमुख सेवांचे वितरण यासाठी ‘100 दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम’ राबविण्यात आला होता. यामध्ये कार्यालयीन कामकाजात नवकल्पना व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विहित वेळेत सेवा वितरण, ई-ऑफिसची अंमलबजावणी,

डिजिटलायझेशन व कागद विरहित कार्यालयीन कामकाज, नागरिकांच्या तक्रारींचे जलद निराकरण, कार्यसंस्कृती सुधारणा अंतर्गत प्रशिक्षण अशा विविध बाबींच्या अनुषंगाने मूल्यमापन करण्यात आले. या बाबींमध्ये उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जालना यांनी उत्तम कामगिरी केली.

या उपक्रमासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी मर्यादित वेळेत विशेष काम करुन हे यश संपादन केल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल यांनी सांगितले.

-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र भूषण राम सुतार श्रद्धांजली सभेचे उद्या दिल्लीत आयोजन

vishwatmaklokswamivarta

वांशिक नरसंहार स्मृती दिनानिमित्त राज्यपालांची मृतात्म्यांना श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta

मान्सून पूर्वतयारीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज मोती तलाव येथे आपत्कालीन शोध व बचाव साहित्याची रंगीत तालीम संपन्न..

एन. डी. आर. एफ. पथकाने सतर्क राहून कामकाज करावे- जिल्हाधिकारी अशोक काकडे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची जिल्ह्यात यशस्वी अंमलबजावणीदुसरी यादी 15 ऑगस्टपूर्वी प्रसिद्ध होण्याची शक्यता- जिल्हाधिकारी संतोष पाटील

जमीन आरोग्य व्यवस्थापनासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन आवश्यक :डॉ संग्राम काळे*

vishwatmaklokswamivarta