vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

सीरम इंस्टिट्यूटला मोठा झटका; लहान मुलांसाठीच्या लसींच्या ट्रायल्सला परवानगी देण्याबाबत सरकारी पॅनला मोठा निर्णय.

 सीरम इंस्टिट्यूटला मोठा झटका; लहान मुलांसाठीच्या लसींच्या ट्रायल्सला परवानगी देण्याबाबत सरकारी पॅनला मोठा निर्णय…

प्रतिनिधी,: सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडियाला मोठा झटका बसला आहे. सीरम इंस्टिट्यूटला सरकारी पॅनेलने 2-17 वयाच्या मुलांसाठी कॉव्होव्हॅक्सच्या लसीच्या चाचणीची परवानगी देण्यास नकार दिला आहे. सीरम इंस्टिट्यूटने सोमवारी ड्रग कंट्रोलर ऑफ जनरल ऑफ इंडियाला अर्ज केला होता. या अर्जामध्ये 10 ठिकाणच्या 920 लहान मुलांवर कॉव्होव्हॅक्सची ट्रायल चाचणीसाठी परवानगी मागितली होती.

मात्र भारताच्या औषध नियंत्रक मंडळाच्या सरकारी पॅनेलने कोवोवॅक्सच्या चाचण्यांना परवानगी नाकारली. ह्या लसीला अजून कोणत्याही देशाने लहान मुलांसाठी मान्यता दिली नसल्याचं सांगत सीरमला परवानगी नाकारण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यापासून कोरोनावरील ‘कोवोव्हॅक्स’ लसींचं उत्पादन सुरु झालं आहे. भारतात कोवोव्हॅक्स लसीला सप्टेंबरपर्यंत मान्यता मिळण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे कोवोव्हॅक्स ही लस दक्षिण आफ्रिका तसंच ब्रिटिश व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. सप्टेंबर 2020मध्ये नोवाव्हॅक्सने सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियासोबत करार केला होता.

कोवोव्हॅक्स लसीला मान्यता मिळाली असती तर ती मुलांवर ट्रायल चाचणी होणारी तिसरी लस बनली असती. यापूर्वी, भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन आणि जाइडस कॅडिलाच्या ZyCov-D या लसींच्या मुलांवर चाचण्या सुरू आहेत.

संबंधित पोस्ट

कोरोनामुळे अडचणीत आलेल्या पालकांना मोठा दिलासा, खासगी शाळांच्या फीमध्ये कपात

ठाणे जिल्ह्यात २३ नोव्हेंबर २०२५(रविवार)रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) चे आयोजन१७,०३३ उमेदवार देणार परीक्षा

vishwatmaklokswamivarta

महाकवी कालिदास नाट्यगृह येथे रक्षाबंधन उत्सवास मुख्यमंत्री यांची उपस्थिती;बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी 10 जिल्ह्यांमध्ये ‘बचत गट मॉल्स’-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यासह चौदा जणांवर गुन्हा

विशेष – दत्त जयंतीचे महत्त्व

vishwatmaklokswamivarta

ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज (१० ऑक्टोबर) एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार

vishwatmaklokswamivarta