vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील व्यायामशाळेचे लोकार्पण रुग्णांची देखभाल करतांना स्वतःचे आरोग्य उत्तम ठेवा- पालकमंत्री शिरसाट

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील व्यायामशाळेचे लोकार्पण रुग्णांची देखभाल करतांना स्वतःचे आरोग्य उत्तम ठेवा- पालकमंत्री शिरसाट

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी, डॉक्टर्स हे अहोरात्र रुग्णांना वैद्यकीय सेवा देतात. हे पवित्र कार्य करतांना डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या आरोग्याची देखभाल करणे आवश्यक आहे. त्यासाठी व्यायामशाळा त्यांना उपयुक्त ठरेल, त्याचा त्यांनी लाभ घ्यावा, अशा शब्दात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांशी संवाद साधला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक व्यायामशाळेचे आज पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. अरविंद गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर तसेच नंदकुमार घोडेले, जिमखाना समन्वक मिर्जा सिराज बेग, विद्यार्थी समन्वक आकांक्षा सिंग, हर्षदा शिरसाठ तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी, डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, येथे योगा आणि जिम सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या रुग्णालयात आलेला रुग्ण चांगले उपचार घेऊन दुरुस्त होऊन घरी जावा. त्यासाठी आपण त्यांना सेवा देतो. हे करत असतांना आपले शारिरीक व मानसिक आरोग्य उत्तम असणे आवश्यक आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या या व्यायामशाळेत २२ व्यायामाची साधने लावलेले आहेत. वॉकिंग ट्रॅक, इनडोअर गेम साठी हॉल असून योगासने आदींसाठीही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे., अशी माहिती अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांनी यावेळी दिली.

०००००

संबंधित पोस्ट

राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन रंगणार गोंडवाना विद्यापीठात

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या**पालखीचे जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात आगमन*

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी राज्यभरातील १,०२८ केंद्रांवर आयोजित करण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ पुढे ढकलण्यात आली

अन्न, नागरी पुरवठा विभाग-राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ क्विंटल मागे १५० ऐवजी १७० रुपये मिळणार

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गततीन दिवसीय विक्री व प्रदर्शनाचे आयोजन

पुणे–मुंबई एक्सप्रेस वे’ वरील अपघातामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द वाहतूक सुरळीत होताच बससेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत होणार

vishwatmaklokswamivarta