vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल; मोर्चाच्या समन्वयकांसह दोन खासदार सात आमदार आणि महापौरांवर गुन्हे?

 मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल; मोर्चाच्या समन्वयकांसह दोन खासदार सात आमदार आणि महापौरांवर गुन्हे

प्रतिनिधी,सोलापुरात काल 4 जुलै रोजी मराठा समाजाच्यावतीने आक्रोश मोर्चाचा आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार तसेच माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी केलं. काल सोलापूर जिल्हाभरातून या मोर्चासाठी हजारोच्या संख्येने मराठा बांधव सोलापूरमध्ये जमले होते. या मोर्चाला भारतीय जनता पार्टीचं उघड समर्थन होतं त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यातले सात आमदार दोन खासदार तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर इत्यादी नेते हजर होते. सोबतच भाजपचे इतर पदाधिकारी देखील हजर होते या सर्व पदाधिकाऱ्यांवर तसेच नरेंद्र पाटील आणि मोर्चाच्या सोलापुरातील समन्वयकांवर सोलापूर मधील फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

भांदवी कलम 188, 269, 270, 336 आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार मोर्चाच्या समन्वयकांसह दोन खासदार सात आमदार आणि महापौरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये मोर्चाचे समनव्यक किरण पवार, राम जाधव यांच्यासह माजी आमदार नरेंद्र पाटील खासदार डॉ. जय सिद्धेश्वर शिवाचार्य, खासदार रणजित निंबाळकर, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार प्रशांत परिचारक, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार समाधान अवताडे, आमदार राजेंद्र राऊत, आमदार राम सातपुते, महापौर श्रीकांचना यन्नम यांच्यासह 46 जण आहेत.

संबंधित पोस्ट

येत्या पाच वर्षात ‘जीएसडीपी’ ३५ लाख कोटींवर नेण्याचे ध्येय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘महा स्ट्राइड’ उपक्रमाचा शुभारंभ; ‘मित्र’ राज्याच्या विकासाला दिशा देणारी महत्त्वपूर्ण संस्था म्हणून नावारूपास येईल

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता आरक्षण सोडत सुव्यवस्थित रितीने संपन्न

vishwatmaklokswamivarta

देशात २४ तासात नव्या रुग्णांमध्ये ३.७ टक्के वाढ, तर देशात शुक्रवारी विक्रमी लसीकरण 

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात आसपासच्या परिसरामध्ये अनधिकृत संस्था आढळून आल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तसेच टोल फ्री क्रमांक 1098 वर संपर्क साधावा

ठाणे, पालघर, रायगड मध्ये मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री यांनी मानले केंद्र सरकारचे आभार मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा

vishwatmaklokswamivarta