vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पेट्रोल डिझेल दरवाढ, डिझेलही शंभरीच्या उंबरठ्यावर..

पेट्रोलपाठोपाठ डिझेलही शंभरीच्या उंबरठ्यावर..

 

 

प्रतिनिधी: जिल्ह्यात पेट्रोल पाठोपाठ आता डिझेलही शंभरीच्या उंबरठ्यावर आले आहे. केवळ एका चौकाराची गरज असून, लवकरच शंभरी पार करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे महागाईचा आलेख शिखराकडे निघाला असून, यात अनेकांची आर्थिक घडी विस्कटत आहे. जिल्ह्यात कोनोनाच्या संसर्गाने संकटात सापडलेल्या नागरिकांना आता इंधन दरवाढीचा ‘शॉक’ बसला आहे. कोरोना संपताच पेट्रोल पाठोपाठ डिझेलचेही भाव गगनाला भिडत आहेत.

 

गेल्या महिन्यात पेट्रोलने ऐतिहासिक टप्पा ओलांडला होता. प्रतिलिटर १०० रुपयांपेक्षा जास्तीची भाववाढ झाल्याने अनेकांना आर्थिक फटका सहन करावा लागला. त्याशिवाय घरगुती वापराचा गॅसही महागल्याने महिला वर्गाचे गणित चांगलेच कोलमडले. एकाच वेळी तब्बल २५ रुपयांची वाढ करण्यात आल्याने सामान्य नागरिकांना दरवाढीचा ‘शॉक’ बसला आहे. जिल्ह्यात आता डिझेलचीही मोठी भाववाढ होत आहे. सध्या डिझेल ९६ रुपये एक पैसा या दराने विकले जात आहे. हेच गेल्या महिन्यात ९० पेक्षाही कमी होते. महिन्यातच तब्बल १० रुपयांच्या पुढे दर सरकले आहेत. त्यामुळे डिझेलही दरवाढीचा ऐतिहासिक टप्पा ओलांडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

 

 

डिझेल दरवाढीचा सर्वाधिक फटका-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. एस.टी. बससेवा, ट्रॅक्सी या डिझेलवर चालतात. त्यामुळे यामध्ये थोडीही दरवाढ झाली तरीही त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसतो. भाजीपाला, किराणामाल आदी साहित्य तत्काळ महागते. परिणामी, सामान्य वर्गाचा खिसा कापला जातो. त्यामुळे डिझेल दरवाढही महागाईचे संकेत.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रातील: नाशिक पोलीस आयुक्तांच्या लेटरबॉम्बने खळबळ

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

राष्ट्रीय ‘वीर गाथा 5.0’ मध्ये महाराष्ट्र अव्वल-देशातील सुपर 100 मध्ये सर्वाधिक 19 विजेते महाराष्ट्राचे

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी…

vishwatmaklokswamivarta

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त शनिवारी (दि.३१) बाईक रॅली

२६/११ मुंबई दहशतवादी हल्लयात शहीद झालेले अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि *अशोकचक्र* सन्मानित *शहीद अशोक कामठे* आज यांचा *जन्मदिवस* त्यानिमित्ताने त्यांच्या *स्मृतीस विनम्र अभिवादन..!* 💐💐

vishwatmaklokswamivarta