vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

दिव्यांग बालकांच्या तपासणी शिबिरांचे आयोजन

दिव्यांग बालकांच्या तपासणी शिबिरांचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण औरंगाबाद, दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी औरंगाबाद, आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बालकांमधील दिव्यांगत्वाचे निदान, तपासणी शिबीराचे आयेाजन केले आहे. दि.21 जून 2025 रोजी दुपारी 12 वा. जिल्हा रुग्णालय घाटी येथील बाह्य रुगण विभागाच्या पोर्चमध्ये करण्यात आले आहे.

शिबीरामध्ये शहरातील 0 ते 18 वयोगटातील ज्या दिव्यांग बालकांना यु.डी.आय.डी.प्रमाणपत्र मिळाले नाही त्यांची तपासणी करुन त्यांना यु.डी.आय.डी. प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येईल व जिल्हा समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांग बालकांसाठीच्या योजना विषयी मार्गदर्शन करण्यात येईल.

या शिबीराचा जास्तीत जास्त दिव्यांग बालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, औरंगाबाद व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव वैशाली पी. फडणीस यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

सिकलसेल मुक्तीसाठी १५ जानेवारीपासून विशेष अभियान*७ फेब्रुवारीपर्यंत तपासणी व जनजागृती*

vishwatmaklokswamivarta

आरोग्य क्रांतीकडे गडचिरोलीची वाटचाल!  ​’माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ मोहिमेत जिल्ह्यातील ४५९ ग्रामपंचायतींचा उत्स्फूर्त सहभाग 

टीबीमुक्त बुलढाणासाठी सीईओ गुलाब खरात यांचा पुढाकार; सहा महिन्यांसाठी टीबी रुग्ण दत्तक

कायदेविषयक शिबीरात कुष्ठरोगाबाबत जनजागृती

कुष्ठरुग्ण शोध अभियानात जिल्ह्यात ८३ नवीन कुष्ठरुग्ण आढळले  १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ दरम्यान व्यापक सर्वेक्षण…

vishwatmaklokswamivarta

महाआरोग्य शिबिर- संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा २०२५-

vishwatmaklokswamivarta