vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी सध्याची वेळ योग्य – दिल्ली उच्च न्यायालय.

देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी सध्याची वेळ योग्य – दिल्ली उच्च न्यायालय…देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी सध्याची वेळ योग्य – दिल्ली उच्च न्यायालय…

प्रतिनिधी नवी दिल्ली,देशात येणाऱ्या काळात ..युवा पिढीला हा त्रास भोगावा लागू नये यासाठी देशात समान नागरी कायदा लागू करणे आवश्यक बनले आहे. राज्यघटनेच्या अनुच्छेद ४४ मध्ये समान नागरी कायदा लागू होण्याची आशा व्यक्त केली आहे. देश आज धर्म, जाती, समुदाय याच्या पलीकडे जाऊन विचार करू लागला आहे. त्यामुळे भारतात समान नागरी कायदा (Uniform Civil Code) लागू करण्यासाठी सध्याची वेळ अत्यंत योग्य आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकारने विचार करावा, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. घटस्फोटाच्या एका प्रकरणात निकाल देताना न्या. प्रतिभा सिंह यांनी म्हटले आहे की, आधुनिक भारतात जात, धर्म, प्रांत यांच्यामुळे निर्माण होणारे अडथळे हळूहळू कमी होत आहेत. त्यामुळे विवाह तसेच घटस्फोटांच्या प्रकरणांत काही समस्याही निर्माण होत आहेत. युवा पिढीला हा त्रास भोगावा लागू नये यासाठी देशात समान नागरी कायदा लागू करणे आवश्यक बनले आहे. राज्यघटनेच्या अनुच्छेद ४४ मध्ये समान नागरी कायदा लागू होण्याची आशा व्यक्त केली आहे. मात्र ही गोष्ट प्रत्यक्षात आली पाहिजे.घटस्फोटाच्या एका प्रकरणात हिंदू विवाह कायद्याप्रमाणे की मीना जमातीच्या नियमांच्या आधारे निकाल द्यावा, असा यक्षप्रश्न दिल्ली उच्च न्यायालयासमोर उभा राहिला होता. पतीला हिंदू विवाह कायद्याप्रमाणे घटस्फोट हवा होता. तर मी मीना जमातीची असल्याने मला हिंदू विवाह कायदा लागू होत नाही असा पत्नीचा दावा होता. पतीने कुटुंब न्यायालयात दाखल केलेला घटस्फोटाचा अर्ज फेटाळून लावावा अशी पत्नीची मागणी होती. त्याविरोधात पतीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने पतीचे म्हणणे मान्य केले. या प्रकरणात निकाल देताना न्यायालयाने म्हटले आहे की, वैयक्तिक कायद्यांमध्ये असलेल्या फरकांमुळे अनेकदा न्यायालयांना पेचप्रसंगांना सामोरे जावे लागते. अशावेळी समान नागरी कायद्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर जाणवते. त्यामुळे या निकालाची प्रत केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे त्वरित पाठविण्यात यावी. केंद्र सरकारने समान नागरी कायदा लागू करण्याबाबत विचार करावा.

अशी आहे वैयक्तिक कायद्यांतील विविधताविवाह, घटस्फोट, वारसा हक्क आदी वैयक्तिक विषयांसाठी भारतात वेगवेगळे कायदे आहेत. हिंदू विवाह कायदा, हिंदू वारसा हक्क कायदा, ख्रिश्चन विवाह कायदा, पारसी विवाह व घटस्फोट कायदा अस्तित्वात आहे. मुस्लिमांच्या वैयक्तिक बाबींसाठीचे कायदे हे शरियतवर आधारित आहेत.

संबंधित पोस्ट

कृषी यांत्रिकीकरणातून शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामग्रीचा लाभ देण्यासाठी शासन कटिबद्ध – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे सोलापूर जिल्ह्यात १००० अनुदानित ट्रॅक्टरचे वितरण; कृषी यांत्रिकीकरणाला नवे बळ

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईत आणीबाणीच्या कालखंडाविषयी विविध उपक्रमांतून लोकशाहीचा जागर*

आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार-मंत्री अतुल सावे

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा दिलासा;परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णयशैक्षणिक संस्थांनी पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी पुढे यावे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सरहद शौर्याथाँन- २०२४ स्पर्धेच्या लोगो, वेबसाईटचे अनावरण

सिल्लोड सोयगाव मतदारसंघातीलपाणी पुरवठा योजनांना गती द्यावी- मंत्री गुलाबराव पाटील

vishwatmaklokswamivarta