vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

गुणवंत खेळाडू घडवण्यासाठी गावा गावात क्रीडा सुविधांसाठी ५० कोटी रुपयांची तरतुद- क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

गुणवंत खेळाडू घडवण्यासाठी गावा गावात क्रीडा सुविधांसाठी ५० कोटी रुपयांची तरतुद- क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील ग्रामीण भागात क्रीडा क्षेत्रात अनेक गुणवंत विद्यार्थी आहेत. त्यांच्या गुणांना वाव मिळावा तसेच त्यांना सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्यात गावागावात क्रीडा सुविधा उभारण्यासाठी ५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक गावात १० लाख रुपयांपर्यंतचे क्रीडा साहित्य पुरवण्यास क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंजुरी दिली. राज्य क्रीडा विकास निधी सनियंत्रण समितीची बैठक क्रीडा मंत्री भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली.

राज्यातील खासगी शैक्षणिक संस्थेद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित तसेच विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, ज्यांना शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे अशा सर्व शैक्षणिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, विविध विभागांमार्फत चालविण्यात येणाऱ्या शाळा, आश्रमशाळा, वसतीगृहे यांना हे क्रीडा साहित्य पुरविण्यात येणार आहे. तसेच एकविध खेळाच्या क्रीडा संघटन, खासगी क्लब, क्रीडा मंडळे, युवक मंडळ, महिला मंडळे यांनाही १० लाखापर्यंतचे क्रीडा साहित्य देण्यास मान्यता देण्यात आली.

हातकणंगले व हुपरी तालुका क्रीडा संकुल संदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. यासाठी आवश्यक निधीच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तर धारावी येथील भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, मुंबई शहर या कामामधील त्रुटी ठेकेदार कंपनीने तत्काळ दूर कराव्यात. कोणतेही काम अपूर्ण ठेऊ नये अशा सूचना क्रीडा मंत्री भरणे यांनी यावेळी दिल्या.

संबंधित पोस्ट

इंटर एनसीसी ग्रुप स्पोर्ट्स शूटिंग स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने संडे ऑन सायकल फिटनेस का डोस या आधा घंटा रोज सायकल रॅलीचे आयोजन

क्रीडा महोत्सवात अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग-सुदृढ आरोग्यासाठी खेळ अत्यावश्यक – मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव

vishwatmaklokswamivarta

विकसित महाराष्ट्र 2047 अंतर्गत युवा आणि क्रीडा संवाद..

vishwatmaklokswamivarta

आकार जिम्नॅस्टिक्सच्या तीन खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड..

क्रीडा पुरस्कार 2023-24 साठी-26 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्जमागणी..

vishwatmaklokswamivarta