vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

आकार जिम्नॅस्टिक्सच्या तीन खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड..

आकार जिम्नॅस्टिक्सच्या तीन खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड..

 

कल्याण प्रतिनिधी : सर्व खेळाचा पाया असलेल्या जिम्नॅस्टिक्स या ऑलिम्पिक खेळ प्रकाराकडे खेळाडूंचा कल वाढत आहे. कल्याण जवळील बापगाव येथील आकार जिम्नॅस्टिक्स सेंटरमधील तीन खेळाडू ट्रॅम्पोलीन जिम्नॅस्टिक्सच्या चॅम्पियनशिप राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवडले गेले आहेत. चिराग केणे (सब ज्युनीअर), अभिप्रीत विचारे (ज्युनिअर) आणि वार्या पाटील – टंबलिन (ज्युनिअर) हे तीन खेळाडू ८ ते १० ऑगस्ट दरम्यान डेहराडून मध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी हे खेळाडू कसून सराव करत आहेत.

 

कल्याणातील आकार जिम्नॅस्टिक्स सेंटर मध्ये आजवर शेकडो खेळाडूनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत शहराचा नावलौकीक केला आहे. आता या तीन खेळाडूंनी राज्यस्तरावर आपल्या खेळाची चमक दाखवत राज्यसंघात स्थान मिळविण्यात यशस्वी ठरले आहेत. या खेळाडूना मुख्य प्रशिक्षक निशांत यशवंतराव यांचं तंत्रशुद्ध मार्गदर्शन आणि आंतरराष्ट्रीय पदक विजेता व शिवछत्रपती पदक विजेता प्रशिक्षक अभिजीत ईश्वर शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

जिम्नॅस्टिक्सची आवड असलेल्या आपल्या दोन्ही मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण घेता यावे या उद्देशाने पुष्पा शिंदे यांनी आकार जिम्नॅस्टिक्सची कल्याण जवळील बापगाव परिसरात निर्मिती केली असून असून सध्या या केंद्रात आंतरराष्ट्रीय दर्जाची उपकरणं, ट्रॅम्पोलीन, टम्बलिंग ट्रॅक, फ्लोअरिंग, सेफ्टी मॅट्स आणि अनुभवी कोचिंग स्टाफ उपलब्ध असल्याने ऑलिम्पिक स्पर्धेत निवड झालेले देशभरातील खेळाडू या केंद्रात सरावासाठी येतात. दरम्यान प्रचंड मेहनत करणाऱ्या आपल्या खेळाडूना आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स नकाशावर पोचविणे हा आपला उद्देश असल्याचे प्रशिक्षक अभिजित शिंदे यांनी सांगितले.

00000

संबंधित पोस्ट

कोल्हापुरचा अजिंक्य रेडकर नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचा विजेता-नेरूळच्या निरंत पाटील याने पटकाविला नमुंमपा क्षेत्र श्री सन्मान

नवोदयच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय एकता समागमात ऐतिहासिक कामगिरी व्हायोलिन वादन तसेच 2-डी आर्ट मध्ये देशात पहिला क्रमांक प्राप्त…

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय जनसंपर्कासाठी निघालेल्या भारतीय नौदलाच्या कार रॅलीला नौदल प्रमुखांनी हिरवा झेंडा दाखवून केले रवाना

vishwatmaklokswamivarta

ॲथलेटिक्स खेळाडूच्या निवड चाचणीचे आयोजन

मिशन लक्ष्यवेध योजनेंतर्गत खेळाडूंनी निवड चाचणीसाठी 9 एप्रिलपर्यंत अर्ज करावेत- जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर- रोइंग, लॉन टेनिस, मैदानी, बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारातील प्रत्येकी 20 खेळाडूंची निवड होणार

vishwatmaklokswamivarta

फिट इंडिया उपक्रमांतर्गत सांगलीत सायकल रॅली- शरीर निरोगी राहण्यासाठी किमान अर्धातास दररोज व्यायाम करा