vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

नवोदयच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय एकता समागमात ऐतिहासिक कामगिरी व्हायोलिन वादन तसेच 2-डी आर्ट मध्ये देशात पहिला क्रमांक प्राप्त…

नवोदयच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय एकता समागमात ऐतिहासिक कामगिरी व्हायोलिन वादन तसेच 2-डी आर्ट मध्ये देशात पहिला क्रमांक प्राप्त…

      अमरावती, प्रतिनिधी पी. एम. श्री. जवाहर नवोदय विद्यालय, अमरावती येथील दोन विद्यार्थ्यांनी दिल्लीतील राष्ट्रीय बाल भवन येथे नुकत्याच झालेल्या 24 व्या राष्ट्रीय एकता समागम-2025 मध्ये विशेष कामगिरी करून जिल्ह्याचे नाव देशपातळीवर उज्ज्वल केले.

    विद्यालयातील मास्टर वेदांत अथीलकर याने व्हायोलिन वादनात देशात प्रथम क्रमांक मिळवला, तर मास्टर हर्षल सोनोने याने 2-डी आर्ट मध्ये देशात पहिला क्रमांक पटकावला. याशिवाय, समूह वादन (अकेस्ट्रा) या प्रकारात मास्तर दर्शन निकोडे, जीत खवले, अर्णव बोडखे आणि आरुष पाझरे या विद्यार्थ्यांनी उपविजेता क्रमांक पटकाविला.

   याप्रसंगी नवोदय विद्यालय समिती, दिल्लीचे आयुक्त राजेश लखानी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव केले. नवोदय विद्यालय समितीने संपूर्ण देशातील 661 नवोदय विद्यालयांमधून विभागीय, क्षेत्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर कला, संस्कृती व संगीताशी संबंधित विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. अमरावतीच्या या विद्यार्थ्यांनी सर्व पातळ्या यशस्वीरित्या पार केल्या. महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दादर नगर हवेली व दमण या 5 राज्यांचा समावेश असलेल्या पुणे संभागमध्ये एकूण 6 प्रथम क्रमांक पटकावले असून, त्यापैकी अमरावती नवोदयने एकट्याने 2 प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

      पुणे विभागाच्या उपायुक्त श्रीमती मेरी मनी, तसेच सह उपायुक्त श्री. प्रेमकुमार यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले. विद्यालयाचे प्राचार्य आर. एस. चंदनशिव, उपप्राचार्य एस. हिसवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत शिक्षक विनोद अथीलकर आणि कला शिक्षक एस. एन. मालवीय यांच्या प्रशिक्षणाने तसेच सर्व शिक्षकांच्या सहकार्यानेच हे यश शक्य झाल्याचे पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी सांगितले.

000000

संबंधित पोस्ट

मेरा युवा भारततर्फे तालुकास्तरीय खेळ स्पर्धा

एनसीसी संचालनालय, महाराष्ट्रने शनिवार वाडा येथून पुणे-दिल्ली सायकल मोहीम ‘शौर्य के कदम, क्रांती की ओर’ ला हिरवा झेंडा दाखवून केले रवाना

vishwatmaklokswamivarta

न्यू पनवेलमध्ये “मिशन लक्ष्यवेध” टेबल टेनिस, मुंबई विभागीय निवड चाचणीचा बिगुल ३४ अव्वल खेळाडूंमध्ये चुरस

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बुलढाण्यात महिला मॅरेथॉनचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत पुणे विभागीय क्रीडा निपुणता केंद्र सुरू

रक्षामंत्र्यांनी स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा यांना प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलच्या मानद दर्जाचे सन्मान चिन्ह केले प्रदान लेफ्टनंट कर्नल (मानद) नीरज चोप्रा हे चिकाटी, देशभक्ती आणि उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील असलेल्या भारतीय भावनेचे प्रतीक: राजनाथ सिंह

vishwatmaklokswamivarta