vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी त्वरित पूर्ण करण्याचे आवाहन

शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी त्वरित पूर्ण करण्याचे आवाहन

         अमरावती, प्रतिनिधी: अमरावती जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे बाधित झालेल्या 5 लाख 69 हजार शेतकऱ्यांच्या मदतीचा महत्त्वपूर्ण डेटा ई-पंचनामा पोर्टलवर अपलोड केला आहे. या नुकसानीपोटी आतापर्यंत 542 कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे. या निधीचा लाभ संबंधित शेतकऱ्यांपर्यंत सुरळीत पोहोचवण्यासाठी आणि केंद्र व राज्य सरकारच्या भविष्यातील सर्व योजनांसाठी पात्र होण्यासाठी, जिल्हा प्रशासनाने सर्व शेतकऱ्यांना ई-केवायसी त्वरित पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. ई-केवायसी सुविधा पूर्ववत सुरू झाली असल्यामुळे, ज्या शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत ई-केवायसी केलेली नाही, त्यांनी तात्काळ आधार कार्डसह आपल्या जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रा’वर जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.

    तसेच, ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी केलेली नाही, त्या सर्व शेतकऱ्यांनी आपला गाव नमुना नं. 7/12 उतारा व आधार कार्डसह आपले सरकार सेवा केंद्रावर जावून नोंदणी करून ‘फार्मर आयडी’ प्राप्त करून घ्यावा. जिल्हा प्रशासनाच्या या आवाहनानुसार, सर्व शेतकऱ्यांनी तातडीने या प्रक्रिया पूर्ण करून पुढील शासकीय योजनांच्या लाभासाठी पात्र व्हावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविण्यात आले आहे.

 

000000

संबंधित पोस्ट

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे-  रोहयो मंत्री भरत गोगावले

शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य देणारे परंपरागत देशी खेळ, संस्कृती संवर्धनाचेही माध्यम – सभापती प्रा.राम शिंदे ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव परंपरागत देशी खेळांच्या क्रीडा महाकुंभाची जल्लोषात सांगता

पाकिस्तानच्या वाढत्या तणावात- केंद्रीय गृह मंत्रालयाने उद्या संपूर्ण देशात देशव्यापी सुरक्षा मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले आहेत

विद्यापीठांनी ‘स्कूल – कनेक्ट’ व महिला सक्षमीकरणासाठी ‘स्वयंसिद्धा’ उपक्रम कसोशीने राबवावेत – राज्यपाल जिष्णु देव वर्मा अंमलबजावणीचा त्रैमासिक अहवाल लोकभवन येथे पाठवण्याची सूचना

सर्व शाळांमध्ये इयत्ता तिसरीपासून कृत्रिम बुद्धिमत्तेवरील अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार कृत्रिम बुद्धिमत्तेतील शिक्षणाकडे आपल्या सभोवतालच्या जगाशी जोडलेले मूलभूत सार्वत्रिक कौशल्य म्हणून पाहिले जावे – सचिव, शालेय शिक्षण

vishwatmaklokswamivarta

मुंबईसह अनेक भागांत जोरदार मुसळधार पावसाचा इशारा