vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दिव्यांग क्षेत्रातील व्यक्ती व संस्थांना आवाहन 

दिव्यांग क्षेत्रातील व्यक्ती व संस्थांना आवाहन

जालना, प्रतिनिधी:- दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थाना नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातील दिव्यांग क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्था व त्यांच्याकडे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 च्या कलम 49-53 नुसार वैद्य नोंदणी प्रमाणपत्र नाहीत. अशा नागरी समाज संघटना/संस्थांनी 17 ऑक्टोबर 2025 रोजीच्या शासन निर्णयातील नमुद प्रस्ताव जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्या कार्यालयात दि. 27 नोव्हेंबर 2025 रोजी किंवा त्यापुर्वी समक्ष उपस्थित राहून सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नु पी. एम. यांनी केले आहे.

दिव्यांग कल्याण विभागाच्या 17 ऑक्टोबर 2025 च्या शासन निर्णयानुसार दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या नोंदणी देखरेख आणि नूतनीकरणासाठी मानक कार्यप्रणाली विहित करण्याबाबत मार्गदर्शक सुचना निर्गमित करुन महाराष्ट्र शासन दिव्यांग व्यक्तीची प्रतिष्ठा, हक्क आणि सुरक्षा यांच संरक्षण करण्यास कटिबध्द आहे. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणात नागरिक, नागरी समाज संघटना/संस्था महत्वपुर्ण भूमिका बजावतात. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 च्या कलम 49-53 पुनर्वसन आणि सक्षमीकरण क्षेत्रात काम करणाऱ्या नागरी समाज संघटनांची/संस्थांची नोंदणी अनिवार्य आहे. तथापी दिव्यांग क्षेत्रात अनेक नागरी समाज संघटना/संख्या अद्याप वैद्य नोंदणीशिवाय दिव्यांग क्षेत्रात कार्यरत आहेत, असे निदर्शनास आले आहे. ही बाब दिव्यांग हक्क अधिनियम, 2016 च्या कलम 50 चे उल्लघंन करणारी आहे. कोणतीही व्यक्ती अथवा नागरी समाज संघटना/संस्था दिव्यांग क्षेत्रात वैद्य नोंदणीशिवाय कार्य करु शकत नाही, असे स्पष्ट नमूद आहे. यासंदर्भात दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालयाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली 7 बैठक घेऊन यासंदर्भात निर्देश दिले आहेत. ज्या संस्थां दिव्यांग क्षेत्रात काम कीरीत आहेत व त्यांच्याकडे दिव्यंग क्षेत्रात कार्य कण्याकरीता वैद्य नोंदणी प्रमाणपत्र नाही अशा संस्थांनी वैद्य नोंदणी प्रमाणपत्र मिळण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा वैद्य नोंदणी प्रमाणपत्राशिवाय दिव्यांग क्षेत्रात काम करीत असल्यास दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 च्या कलम 91 अन्वये दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थावर कारवाई करण्यात येईल. असे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी जि.प. जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया स्किल्स हब उभारणीमुळे-शिक्षण-उद्योग सहकार्यास नवी दिशा मिळणार- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

vishwatmaklokswamivarta

मान्सूनपूर्व तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला सविस्तर आढावा सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ.

संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे जमा करण्याचे आवाहनलाभार्थ्यांचा लाभ डीबीटीद्वारे थेट खात्यात जमा होणार..

उद्योग आणि गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस · उद्योगांना आणि गुंतवणूकदारांना पोषक इको सिस्टिम राज्यात उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शुद्ध देशी गोवंश सन्मान योजना;नोंदणीकृत गोशाळांकडून प्रस्ताव मागविले

vishwatmaklokswamivarta

विधानसभा प्रश्नोत्तरे-परवानाधारक व्यापाऱ्यांनाच बांधावर जाऊन शेतमाल खरेदीची परवानगी- पणन मंत्री जयकुमार रावल