vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) आणि खुल्या प्रवर्गात संधी दिली जाणार, राज्य सरकार 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग,एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) आणि खुल्या प्रवर्गात संधी दिली जाणार, राज्य सरकार

प्रतिनिधी मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर ‘एसईबीसी’ प्रवर्गातील उमेदवारांचा समावेश कोणत्या वर्गात करायचा, यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे रखडलेले सुधारित निकाल, नियुक्त्यांचा तिढा आता सुटणार आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) आणि खुल्या प्रवर्गात संधी दिली जाणार असल्याचे सांगितले आहे. परंतु सरकारच्या या निर्णयामुळे काही उमेदवारांमध्ये नाराजी असल्याचे दिसून येते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यापूर्वी घेतलेल्या काही परीक्षांचा निकाल आणि नियुक्त्या या केवळ एसईबीसी आरक्षणाबाबत सरकारकडून योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने रखडल्या होत्या. मात्र, आता राज्य सरकारच्या शासन निर्णयामुळे परीक्षांचे निकाल आणि नियुक्त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. ९ सप्टेंबर २०२० नंतर नियुक्ती देण्यात न आलेल्या उमेदवारांना एसईबीसी प्रवर्गाकरिता राखीव असलेली पदे, जाहिरातीमध्ये ईडब्ल्यूएस आरक्षण नसल्यास, खुल्या पदांत रुपांतरीत करावे तसेच संबंधित पदभरतीच्या जाहिरातीमध्ये ईडब्ल्यूएस आरक्षणाचा उल्लेख असल्यास अशा प्रकरणांत एसईबीसी उमेदवारांना ईडब्ल्यूएस प्रवर्गाचा लाभ देण्यासाठी विकल्प घेऊन, त्यानुसार सुधारित निवडयाद्या लोकसेवा आयोगाने व राज्यातील इतर निवड मंडळांनी संबंधित विभागांना सादर कराव्यात, असे आदेश सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव र. अं. खडसे यांनी दिले आहेत.

संबंधित पोस्ट

धक्कादायक! 14 वर्षीय मुलीला दाखवले लग्नाचे आमिष; अल्पवयीन मुलाकडून अत्याचार

ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढविला बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

दुध उत्पादकांना प्रति लिटर ७ रुपये अनुदान;लाभाचा कालावधी वाढविला८८३२ दुध उत्पादकांचे अनुदान जमा, उर्वरीत रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरु

महाराष्ट्राचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ विकसित भारताचे स्वप्न साकारणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विकसित महाराष्ट्र २०४७ मसुदा सल्लागार समितीची बैठक संपन्न…

vishwatmaklokswamivarta

यूपीएससी, एमपीएससीसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना बार्टीकडून अर्थसहाय्य..

महाबोधी बुद्ध विहार मुक्तीसाठी पंचशिल धम्म ध्वज यात्रा आज जालन्यात नागपूर ते चैत्यभुमी दरम्यान पू.भन्ते विनाचार्य साधणार जनसंवाद