vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी च्या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची राष्ट्रीय अध्यक्ष पदी बिनविरोध निवड…

रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी च्या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची राष्ट्रीय अध्यक्ष पदी बिनविरोध निवड…

 

नवीदिल्ली प्रतिनिधी ~ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज नवीदिल्लीत आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी च्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या बैठकीला देशभरातून 32 राज्यांचे रिपब्लिकन पक्षाचे राज्य अध्यक्ष आणि पक्ष प्रतिनिधी उपस्थित होते.

येत्या 5 वर्षात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया देशभरातील प्रमुख राष्ट्रीय पक्ष म्हणून निवडणुका आयोगाची मान्यता मिळविणारा राष्ट्रीय पक्ष करायचा आहे.त्यासाठी किमान 4 राज्यांत मान्यता आणि 2 खासदार लोकसभेत निवडून आणले पाहिजेत. सध्या रिपब्लिकन पक्षाला मणिपूर आणि नागालँड या दोन राज्यांत मान्यता मिळालेली आहे.लवकरच रिपब्लिकन पक्षाला आसाम ; महाराष्ट्र; कर्नाटक; उत्तर प्रदेश; पाँडिचेरी; दीव दमण दादरा नगर हवेली या राज्यांत आणि केंद्र शासित प्रदेशात मान्यता मिळू शकते.आगामी काळात रिपब्लिकन पक्षाचे लोकसभेत खासदार निवडून येतील त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी काम करून रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्याचे उद्दिष्ट्य पूर्ण केले पाहिजे असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी रिपब्लिकन कार्यकर्त्यांना केले.

रिपब्लिकन पक्ष दलित आदिवासी मुस्लिम सर्व अल्पसंख्यांक यांना घेऊन बहुजन वर्गाची एकजूट उभारून रिपब्लिकन पक्षाची राजकीय ताकद उभी करणार आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा परिवर्तनाचा विचार देशभरात पोहोचवणार आहोत. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्ष देशभरात घराघरापर्यंत पोहोचवणार असल्याचा निर्धार ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केला. रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीला गुजरात चे जतीन भुट्टा; महाराष्ट्रातून अविनाश महातेकर ; गौतम सोनवणे; सुरेश बार्शिंग; कर्नाटक मधून व्यंकट स्वामी; राजस्थान मधून राधामोहन सैनी; हरियाणा चे रवी कुंडली; सिक्किम चे नाम ग्याल; मणिपूर चे महेश्वर थनमजोम ;आंध्र प्रदेश ब्रह्मानंद रेड्डी; तेलंगणा चे नागेश्वर राव ; रवी पासुला; पंजाब च्या मंजु छिबेर; काश्मीर च्या संध्या गुप्ता; गुजरात चे राजकुमार टाक; शैलेश भाई शुक्ला; उत्तर प्रदेश अध्यक्ष पवन गुप्ता: राहुलन आंबवडेकर; महाराष्ट्रातून सौ.सीमाताई आठवले; सौ शीला ताई गांगुर्डे; एम एस नंदा; काकासाहेब खांबलकर; दयाळ बहादुर; ॲड बी के बर्वे; ॲड मंदार जोशी; अनिलभाई गांगुर्डे; विजयराज ढमाळ; बशीरभाई ; आदी अनेक मनावर या बैठकीत उपस्थित राहिले.

हेमंत रणपिसे प्रसिद्धी प्रमुख

 

संबंधित पोस्ट

आसाम, केरळम आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी थंडावणार

vishwatmaklokswamivarta

बाबासाहेबांच्या विचारांतून घराघरात लोकशाही येईल असा नमुंमपा जागर व्याख्यानमालेत ॲड.वर्षा देशपांडे यांचा विश्वास*

हुबळी-धारवाड महानगरपालिकेच्या शिष्टमंडळाची बृहन्मुंबई महानगरपालिकेला भेट

नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीतून पीडितांना न्यायाची हमी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· गुन्हे सिद्धतेचा दर ९० टक्क्यांपर्यंत नेण्याची नवीन फौजदारी कायद्यांमध्ये क्षमता· नवीन फौजदारी कायद्यांवरील ५ दिवसीय प्रदर्शनाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

नागरिकांच्या जीवनात सकारात्क बदल घडविण्यावर महसूल विभागाचा प्रयत्न -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे महसूलमंत्र्यांच्या हस्ते ‘एम.ई.अे. इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो-२०२६’ चे उद्धाटन

नशा नाही, नवचैतन्याची दिशा घेऊया!” — जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या DAWN उपक्रमांतर्गत अंमली पदार्थविरोधी जनजागृती*

vishwatmaklokswamivarta