vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, चिपळूण-खेड-चांदेराईत पुराचे पाणी घुसले, व्यापारी धास्तावले

रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, चिपळूण-खेड-चांदेराईत पुराचे पाणी घुसले, व्यापारी धास्तावले…

प्रतिनिधी : मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. (Heavy rains in Ratnagiri ) जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर होत चालली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला पूर आल्याने चिपळूण बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले आहे. तर खेडमध्ये नारंगी आणि जगबुडी नदीला पूर आला आहे. जगबुडी नदीच्या पुराचे पाणी खेड बाजारपेठेत शिरण्याची शक्यता आहे. तर रत्नागिरी तालुक्यात चांदेराई येथे पुराचे पाणी घुसले आहे. काळजी नदीला आलेल्या पुरामुळे हे पाणी बाजारपेठेत घुसले आहे.

रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाचा चिपळूण शहराला बसला फटका बसला आहे. चिपळूण शहरातील बहादुरशेख भागात पाच फुटापेक्षा पाणी आले आहे. याचा पुराचा फटका तिथल्या दुकानांवर बसला आहे. तर शहरातील अनेक भागात भरले पाणी बाजार पेठ, मच्छी मार्केट, भाजी मार्केट, ठिकाणी या परिसरात पाणी भरले आहे.

खेडमध्येही पूरस्थिती निर्माण झाली आहे. खेड बहिरवली फाटा येथे पुराचे पाणी आले आहे. दापोली – खेड रोड संपुर्ण पाण्याखाली पहाटे 4.30 वाजल्यापासुन पाणी रस्त्यावर 2005 च्या पुरापेक्षा पाण्याची पातळी जास्त आहे.

तर रत्नागिरीतील चांदेराई जवळच्या काजळी नदीला पूर आल्याने चांदेराई बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले आहे. बाजारपेठेत चार फुटांचे पाणी आले आहे. चांदेराई, लांजा आणि चांदेराई रत्नागिरी मार्गावरतीही पाणी आल्याने दोन्हीकडची वाहतूक ठप्प झाली आहे.

संबंधित पोस्ट

त्याग आणि शिस्त हाच खऱ्या देशभक्तीचा पाया : सर्वानंद सोनोवाल

सातारा नगर परिषद प्रकल्पांचा आढावा**पाणीगळती रोखण्यासाठी सर्व नळजोडांना मीटर बसवावेत- पालकमंत्री शंभूराज देसाई*

vishwatmaklokswamivarta

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस * मोर्शी येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे भूमिपूजन

विशेष लेख-: राज्याच्या विकासात महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची साथ… देई राजपत्रित अधिकाऱ्यांना हाक,पगारात भागवा” अभियान.“संकल्प कार्यसंस्कृतीचा..ध्यास राज्याच्या विकासाचा..!”

vishwatmaklokswamivarta

राज्यात विधानसभेच्या 225-250 जागा लढणार – राज ठाकरे यांची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष

जालना व छत्रपती संभाजीनगरमधील #प्रदूषण कमी करण्यासंदर्भात पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी आढावा

vishwatmaklokswamivarta