vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

तुळजाभवानी मंदिर संस्थानाने नवरात्री २०२५ सणाच्या काळात ‘सशुल्क दर्शन पास’ दरात वाढ

तुळजाभवानी मंदिर संस्थानाने नवरात्री २०२५ सणाच्या काळात ‘सशुल्क दर्शन पास’ दरात वाढ

राज्य प्रतिनिधी-तुळजाभवानी मंदिर संस्थानाने नवरात्री २०२५ सणाच्या काळात ‘सशुल्क दर्शन पास’ दरात वाढ केली आहे. आता भाविकांना दर्शनासाठी आधीपेक्षा जास्त शुल्क भरावे लागणार आहे, असा निर्णय मंदिर समितीने घेतला असून त्याबाबतचे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. या निर्णयामुळे भाविकांमध्ये नाराजीचा सूर बघायला मिळत आहे.

या नव्या शुल्कानुसार देणगी दर्शन पास हे सध्या दोनशे रुपयांवरुन ते तीनशे ते हजार रुपये करण्यात आलेले आहे. तसेच अभिषेक पास दर सुद्धा वाढवण्यात आला असून सकाळच्या अभिषेकसाठी असलेली सुरूवातीची किंमत तीनशे रुपयांवरून वाढ करून चारशे रुपये करण्यात आला आहे. हे नवीन शुल्क दिनांक २० सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत लागू राहील असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान नवरात्रीतील गर्दीला नियमन करण्यासाठी पास शुल्क वाढवले असल्याचे मंदिर समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

काश्मिरात पर्यटकांवर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर-मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आपत्कालीन मदत कक्ष…

जिल्हास्तरीय चाचा नेहरु  बाल महोत्सवाला उत्साहात सुरुवात …       

vishwatmaklokswamivarta

बेसा-बेलतरोडी-पिपळा व परिसरातील विकासात नागरी सुविधांवर भर – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरशिवस्मारक आणि शिवमुद्रा उभारणार- सांस्कृतिक कार्यमंत्री अड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी- पेन्शन अदालत     

पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांचे दलित विरोधी कृत्य,पोलीस अधिक्षक यांच्याकडे आंबेडकरी समाजाचे निवेदन; पोलीस निरीक्षकावर पैसे घेऊन खोटा गुन्हा दाखल केल्याचा गंभीर आरोप