vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांचे दलित विरोधी कृत्य,पोलीस अधिक्षक यांच्याकडे आंबेडकरी समाजाचे निवेदन; पोलीस निरीक्षकावर पैसे घेऊन खोटा गुन्हा दाखल केल्याचा गंभीर आरोप

पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांचे दलित विरोधी कृत्य,पोलीस अधिक्षक यांच्याकडे आंबेडकरी समाजाचे निवेदन; पोलीस निरीक्षकावर पैसे घेऊन खोटा गुन्हा दाखल केल्याचा गंभीर आरोप

राज्य प्रतिनिधी -पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांचे दलित विरोधी कृत्य,पोलीस अधिक्षक यांच्याकडे आंबेडकरी समाजाचे निवेदन; पोलीस निरीक्षकावर पैसे घेऊन खोटा गुन्हा दाखल केल्याचा गंभीर आरोप

तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी पैशाची देवान-घेवाण करुन दलितविरोधी कृत्य केले असून त्यांच्यावर कडक कारवाई करुन त्यांना निलंबीत करण्याची मागणी आंबेडकरी समाजाच्या सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्ट मंडळाने केली. या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) आणि विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने अ‍ॅड. ब्रम्हाणंद चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलीस निरीक्षक यांच्यावर गंभीर आरोप केलेत.

यावेळी पत्रकार परिषदेस अ‍ॅड ब्रम्हानंद चव्हाण, अ‍ॅड. शिवाजीराव आदमाने, मधूकर बोबडे, मिलींद पाईकराव, हरिष रत्नपारखे , कपील खरात, बबन रत्नपारखे, अ‍ॅड. सिध्दार्थ चव्हाण, महेंद्र रत्नपारखे, भैयासाहेब बोबडे, मनोज वाबळे, राजेंद्र भिंगारदेव, लहु उघडे, नईम बेग, आदर खान पठाण, मनोज बरवार मदारे, अनलि वानखेडे, जितू उघडे, राहुल रत्नपारखे, दशरथ डोंगरे यांची उपस्थिती होती.

तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआर संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) आणि विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनात संबंधित गुन्हा खोट्या फिर्यादीच्या आधारे नोंदविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यामार्फत स्वतंत्र चौकशी करून संबंधित पोलीस निरीक्षकांवर कारवाई करावी, तसेच गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

दि. 20 जून 2026 रोजी तालुका पोलीस ठाण्यात दिनकर मारोतराव देशमुख आणि रामराव रंगनाथ खडके यांनी दिलेल्या फिर्यादीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला. ही फिर्याद बनावट, काल्पनिक आणि वस्तुस्थितीविरुद्ध असल्याचा दावा निवेदन कर्त्यांनी केला आहे. तसेच फिर्यादी आणि संबंधित पोलीस अधिकार्‍यांमध्ये संगनमत होऊन आर्थिक व्यवहारातून हा गुन्हा नोंदविण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

निवेदनात अ‍ॅड. ब्रम्हानंद चव्हाण यांनी संबंधित जमीन व्यवहाराचा तपशील देत सर्वे क्रमांक 477/3/5 मधील 55 आर जमीन त्यांनी ईसार पावतीद्वारे कायदेशीररीत्या घेतल्याचा दावा केला आहे. या जमिनीची शासकीय मोजणी आणि भूअभिलेख विभागाच्या नोंदीदेखील आपल्या बाजूने असल्याचे त्यांनी म्हटले आहे. फिर्यादीत उल्लेख करण्यात आलेले प्लॉट आणि प्रत्यक्ष जमीन वेगवेगळ्या ठिकाणी असल्याचाही दावा करण्यात आला आहे.

निवेदनात 16 जून 2026 रोजी घडल्याचे सांगितलेल्या घटनेलाही आव्हान देण्यात आले आहे. त्या दिवशी आपण घटनास्थळी नसल्याचा तसेच सहआरोपी म्हणून नमूद करण्यात आलेला मुलगाही त्याच्या कामावर असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित दिवशी फिर्यादी आणि त्यांच्या सहकार्‍यांचे मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी करण्यात आली आहे.तसेच, घटनेनंतर चार दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असताना पोलीसांनी प्राथमिक चौकशी अथवा उपलब्ध पुराव्यांची पडताळणी का केली नाही, असा सवालही निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. फिर्यादीत नमूद करण्यात आलेल्या मारहाण, दंगल, नकाशा फाडणे आणि धमकी देण्याच्या सर्व आरोपांची स्वतंत्र चौकशी करून सत्यता पडताळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.अ‍ॅड. ब्रम्हानंद चव्हाण यांनी आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे राज्य सचिव व वकील असून आपली सामाजिक व राजकीय प्रतिमा मलिन करण्यासाठी तसेच संबंधित जमीन सोडून देण्यास भाग पाडण्यासाठी कट रचल्याचा आरोप केला आहे. तसेच आपण मागासवर्गीय बौद्ध समाजातील असल्यामुळे जातीय द्वेषातून खोटी फिर्याद दाखल करण्यात आल्याचाही दावा त्यांनी केला आहे.या संपूर्ण प्रकरणात संबंधित पोलीस निरीक्षकांवर निलंबनाची कारवाई करून वरिष्ठ अधिकार्‍यामार्फत निष्पक्ष चौकशी करण्यात यावी आणि खोटा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.दरम्यान, या आरोपांबाबत संबंधित फिर्यादी किंवा पोलीस प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

00000

0000

संबंधित पोस्ट

महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव सर्व यंत्रणांनी मिळून यशस्वी करावा ‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’च्या तयारीचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा..

मराठी ही केवळ संवादाची नव्हे, तर रोजगाराची भाषा व्हावी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा येथे ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप

vishwatmaklokswamivarta

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांची अंमलबजावणी गतिमान करावी – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

जुलै 2025 अखेरचा रविवार ज्येष्ठांसाठी ठरला आनंदोत्सव वार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने अराजपत्रित गट-ब आणि गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षांसाठी बसणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत एक वर्षाची विशेष शिथिलता देण्याचा निर्णय..

vishwatmaklokswamivarta

पुनर्विकासाच्या नावाखाली ‘सावरकर सदन’ जमीनदोस्त होऊ देणार नाही!*शासनाने ‘सावरकर सदना’चे संपादन करून ‘राष्ट्रीय स्मारक’ घोषित करावे* – हिंदु जनजागृती समितीची आंदोलनाद्वारे मागणी!