vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

खेळाचे मैदाने, उद्याने,आरक्षित असलेल्या  म्हाडाचे ८० भूखंड जाणार मुंबई महापालिकेच्या ताब्यात, देणात येणार आहे.

खेळाचे मैदाने,उद्याने आदि,आरक्षित असलेल्या  म्हाडाचे ८० भूखंड जाणार मुंबई महापालिकेच्या ताब्यात, देणात येणार आहे.

मुंबई प्रतिनिधी  : खेळाची मैदाने, उद्याने यांच्यासाठी आरक्षित असलेले सुमारे 80 सुविधा भूखंड म्हाडा  देखभालीसाठी महापालिकेच्या  ताब्यात देणार आहे. यासाठीच्या जोरदार हालचाली म्हाडा मुख्यालयात सुरु असून हे भूखंड लवकरच पालिकेला देण्याची तयारी म्हाडाने केली आहे. यामुळे आरक्षित भूखंडावर विविध विकास कामांसाठी निधी खर्च करण्यावरून नगरसेवक आणि आमदारांमध्ये होणाऱ्या वादांवर पडदा पडणार आहे. राज्य सरकारने म्हाडाला स्वतंत्र नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिल्यानंतर मुंबई शहर व उपनगरातील म्हाडा वसाहतींमध्ये महापालिकेतर्फे मलनिःसारण, वाहिन्या, जयवाहिन्या जोडणी, रस्त्यांची दुरुस्ती इत्यादीसारख्या मूलभूत सुविधा देण्यास नकार दिला होता. नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता म्हाडा आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मुंबई शहर व उपनगरातील म्हाडा वसाहतींमध्ये मलनिःसारण वाहिन्या, जलवाहिन्या, रस्ते दुरुस्ती आदी मूलभूत सुविधा महापालिकेमार्फतच पुरविल्या जातील, असा निर्णय घेतला

तसेच महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार म्हाडा वसाहतीमधील आरक्षित भूखंड असलेले खेळाची मैदाने, उद्याने आदी भूखंड महापालिकेकडे सोपविणे आवश्यक आहे. त्यानुसार म्हाडाने आपल्या हद्दीतील भूखंड महापालिकेच्या ताब्यात तात्पुरत्या स्वरूपात देण्याचे निर्णय घेतला आहे. त्यानुसार म्हाडाने शहर आणि उपनगरातील सुमारे 80 भूखंडांची यादी तयार केली आहे. तसेच इतर भूखंडांचीही माहिती जमा करण्याचे काम सुरु असून यासाठी सतत बैठकांचा जोर वाढला आहे. तात्पुरत्या स्वरूपात हे भूखंड म्हाडा महापालिकेच्या ताब्यात देणार आहे. म्हाडाकडे असलेल्या या भूखंडांवर नगरसेवक आणि आमदार निधीतून कामे करण्यासाठी चढाओढ लागत होती. मात्र आता हे भूखंड महापालिकेच्या ताब्यात जाताच लोकप्रतिनिधींमध्ये होणारे वाद शमणार आहेत.

संबंधित पोस्ट

मुंबईत वृ्द्ध व्यक्तीची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या एका तरुणाला खार पोलिसांकडून अटक

vishwatmaklokswamivarta

पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाच्या अध्यक्षपदी शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती

vishwatmaklokswamivarta

राज्यातील आयकॉनिक पर्यटन स्थळांचा विकास करण्यावरती पर्यटन विभागाने भर द्यावा,पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

सैनिकी मुलामुलींचे वसतीगृह, कारगिल स्मृतीवन,सैनिकी विश्रामगृह येथे माजी सैनिकांसाठी पदभरती..

भारतीय संस्कृतीत गायीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे,देशी गायीला राज्यमाता- गोमाता घोषित

महाराष्ट्राला २०४७ पर्यंत जागतिक दर्जाचे कौशल्य केंद्र बनवणार- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा’विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाची कार्यशाळाकार्यशाळेत ६० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा सहभाग…