vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पुण्यातील धक्कादायक घटना,  पाच जणांकडून तीक्ष्ण हत्याऱ्याने वार करत तरुणाचा खून.

पुण्यातील धक्कादायक घटना,  पाच जणांकडून तीक्ष्ण हत्याऱ्याने वार करत तरुणाचा खून.

पुणे प्रतिनिधी : मित्राचे हात उसने घेतलेले पैसे परत का करत नाही, असे विचारायला गेलेल्या मध्यस्थ तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करत खून करण्यात आला. हा प्रकार मांजरी खुर्द येथील स्मशानभूमीजवळ आरोपींच्या घरासमोर रविवारी रात्री ११ वाजता घडला. विकास लक्ष्मण सोनवणे (वय ३१, रा. मांजरी खुर्द) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल.

याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी सांगितले की, विकास सानवणे हा इलेक्ट्रिशन म्हणून काम करत होते. आरोपींनी विकास याचा मित्र गायकवाड याच्याकडून हातउसने पैसे घेतले होते. आरोपी हे पैसे परत करत नसल्याने रविवारी सायंकाळी त्यांच्यात वाद झाला होता.

हे समजल्यावर विकास रात्री ११ वाजण्याच्या सुमारास आरोपींच्या घरी गेला. त्यांना पैसे परत का करत नाही, अशी विचारणा केली. त्यावेळी आरोपींबरोबर वाद झाला. त्यातून पाच जणांनी विकासवर वार करुन त्याचा खून केला. लोणीकंद पोलीस अधिक तपास करीत आहे

संबंधित पोस्ट

अमली पदार्थ विरोधात राज्यात आदर्श ठरेल असे मॉडेल राबवावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटीलअमली पदार्थ टास्क फोर्सच्या तिसऱ्या बैठकीत दिले निर्देश..

vishwatmaklokswamivarta

2022 दिवाळीच भारतीय सैनिकांसह साजरी करण्यासाठी पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी कारगिल मध्ये दाखल..

vishwatmaklokswamivarta

पुण्यातील खळबळ जनक बातमी : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार सहा आरोपींना केली अटक…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र : राज्यातील 600 तहसीलदार आणि 2200 नायब तहसीलदार आजपासून संपावर…

महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू

भगवान बुद्धांनी दिलेला विश्वशांतीचा विचार जगाला तारणारा- केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिल्या सर्व भारतीयांना बुद्धपौर्णिमेच्या शुभेच्छा