vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचा, पाद्यपूजन सोहळा अत्यंत मांगल्यमय आणि पावित्र्यपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

लालबागच्या राजा’चे पाद्यपूजनलाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचा आज सकाळी सहा वाजता पाद्यपूजन सोहळा अत्यंत मांगल्यमय आणि पावित्र्यपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

मुंबई: प्रतिनिधी  लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचा आज सकाळी सहा वाजता पाद्यपूजन सोहळा अत्यंत मांगल्यमय आणि पावित्र्यपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मागील वर्षी कोरोनामुळे  उत्सव न साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र यंदा मंडळाकडून सरकारच्या नियमानुसार उत्सव साजरा करण्यात येणार आहे. लालबागचा राजा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येतात. यंदा ही गर्दी होऊ न देण्याचे मंडळासमोर आव्हान आहे.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ राज्य आणि केंद्र सरकारकडून (state and central government) कोरोनाची नियमावली (corona rules) व वेळोवेळी जाहिर होणाऱ्या निर्बंध, अटी सूचनांचे पालन करून यंदाचा गणेशोत्सव साजरा (Ganpati festival) करणार आहे. कोरोना महामारीच्या तिसर्‍या लाटेचा (corona third wave) धोका व्यक्त केला जात असताना, लालबागच्या राजाचा दरबार भरणार आहे. यावेळी राज्य सरकारने (state government) जाहिर केलेल्या नियमावलीचे पालन करून यंदाची लालबागची मूर्ती ही 4 फुटांपेक्षा उंच नसेल, असे मंडळाकडून सांगण्यात आले.

कोरोना महामारीमुळे मागच्या वर्षी लालबागमध्ये गणेश उत्सव साजरा करण्यात आला नव्हता. त्यामुळे येथे गणेश उत्सवाऐवजी रक्तदान आणि प्लाझ्मा डोनेट कॅम्प लावण्यात आले होते. परंतु यावर्षी लालबाग गणेशोत्वसाचे आयोजन होणार आहे. सरकारच्या नियमावलीनुसार लालबागमध्ये श्री गणरायाची मूर्ती 4 फुटापेक्षा जास्त उंच नसेल. जे लोक घरात गणपतीची मूर्ती स्थापन करतील ते 2 फुटापेक्षा जास्त उंच मूर्ती ठेवू शकत नाहीत. याशिवाय आयोजनाच्या दरम्यान कोरोना नियमांचे विशेष लक्ष ठेवावे लागणार आहे. सरकारने सांगितल्याप्रमाणे, कोरोना संकट लक्षात घेता गणेशोत्सव एकदम साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली

संबंधित पोस्ट

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील अशी घोषणा… भाजपा नेते देवेंद्र फडणवीस

राज्यात आज 2359 ग्राम पंचायत निवडणूकींचा निकाल..

vishwatmaklokswamivarta

महाविकास आघाडी काँग्रेस उमेदवार सोलापूर मध्ये प्रणिती शिंदे विजयी…

महाराष्ट्राचे राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’; शाळांमध्ये दररोज वाजवले जाणार सरकारने जाहीर केली सूचना…

vishwatmaklokswamivarta

मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा अमृत महोत्सव लोकोत्सव व्हावा-सुधीर मुनगंटीवार…

vishwatmaklokswamivarta

सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात देशात महाराष्ट्र अग्रेसर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग पुरस्कार वितरण सोहळा

vishwatmaklokswamivarta