vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दानवे परिवाराच्या वतीने दीपावली स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न जालना जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व राजकीय पक्षाने एकत्रित यावे  – माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे जालना जिल्हा भाजपाचा बालेकिल्ला – मा.आ.कैलासजी गोरंटयाल जिल्ह्यातील जनतेने दानवे परिवाराला भरघोस प्रेम दिले – भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

दानवे परिवाराच्या वतीने दीपावली स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न जालना जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व राजकीय पक्षाने एकत्रित यावे  – माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे जालना जिल्हा भाजपाचा बालेकिल्ला – मा.आ.कैलासजी गोरंटयाल जिल्ह्यातील जनतेने दानवे परिवाराला भरघोस प्रेम दिले – भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

जालना (प्रतिनिधी): जालना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षाने आपसातील राजकीय मतभेद विसरून एकत्रित येऊन विकास साध्य करण्याचे आवाहन माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी जालना येथे जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमात केले.

जालना शहरात सामाजिक ऐक्य व आत्मीयतेचे प्रतीक ठरणारा दीपावली स्नेहमिलन सोहळा माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे व जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता, हा कार्यक्रम आज शुक्रवार, दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत भारती लॉन्स, बालाजी चौक, भोकरदन रोड, जालना येथे संपन्न झाला.

यावेळी माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री आ.अर्जुनराव खोतकर, भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आ.नारायण कुचे, माजी आमदार कैलास गोरंटयाल माजी आमदार अरविंद चव्हाण, माजी आमदार संतोष सांबरे, भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर, सतीश घाटगे, घनश्याम गोयल, अशोक आण्णा पांगारकर, राजेश राऊत, रामेश्वर भांदरगे, बद्रीनाथ पठाडे, विमलताई आगलावे, सुधाकरराव दानवे, युवानेते अक्षय गोरंटयाल, अर्जुन गेही, संध्याताई देठे, अरुणा जाधव, ब्रम्हानंद चव्हाण, शिवाजीराव थोटे, अॅड बाबासाहेब इंगळे, धनराज काबलीये, नगरसेवक सतीश जाधव, जिवन सले, शशिकांत घुगे, ज्ञानेश्वर ढोबळे, महेश निकम, सुनील राठी, रवी अग्रवाल उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, गोवर्धन अग्रवाल, मधुकरराव दानवे, अमोल कारंजेकर, वसंत शिंदे, महावीर ढक्का, विष्णू पाचफुले, सुनील पवार, सोपान पेंढारकर, वसंत जगताप, सुभाष बोडखे, मा.जिल्हा सरचिटणीस देविदास देशमुख, बाबासाहेब कोलते, संजय आटोळे, भगवान मात्रे, गजानन नागवे, संजय डोंगरे, सिद्धिविनायक मुळे आदींची उपस्थिती होती.

यावेळी दीपावली स्नेह मिलन कार्यक्रम प्रसंगी शुभेच्छा देताना माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, मी १९९० ला पहिल्यांदा एकमेव कॉंग्रेस च्या राजवटीत भाजपचा आमदार झालो तेंव्हा पासून मी जालना जिल्ह्याच्या विकास कामासाठी व अनुशेष भरून काढण्यासाठी तत्कालीन सरकारच्या विरोधात आंदोलन केले त्या नंतर १९९५ ला भाजपा युती ची सत्ता असताना जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक कामे मंजूर केली व २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार मध्ये मी मंत्री व भाजपाचा प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे केंद्र व राज्यशासनाच्या अनेक जनकल्याणकारी योजनेंचा फायदा जालना जिल्ह्यासाठी मिळवून दिला. त्यांनी पुढे बोलताना सर्व जालनावासियांना दीपावली व पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद कायम नांदो असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी कैलासजी गोरंटयाल यांनी म्हटले की, जालना जिल्ह्याचे माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्या पराभवामुळे जिल्ह्याच्या विकासाचे मोठे नुकसान झाले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, “रावसाहेब दानवे यांनी मंत्रीपदाच्या काळात जिल्ह्यासाठी अनेक विकासकामे केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकल्पांना गती मिळाली होती. त्यांच्या पराभवामुळे केंद्रातील प्रतिनिधित्व कमी झाले असून, त्याचा थेट परिणाम जिल्ह्याच्या विकासावर झाला आहे, यापुढील कोणत्याही निवडणुकीत भाजपाचा पराभव होणार नसून विजय होणार आहे व जालना जिल्हा भाजपाचा बालेकिल्ला असल्याचे असे त्यांनी सांगितले.

यावेळी भास्कर आबा दानवे म्हणाले की, जालना जिल्ह्यातील जनतेने नेहमीच दानवे परिवारावर अपार प्रेम आणि विश्वास दाखवला आहे, असे मत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी व्यक्त केले.ते म्हणाले की, “दानवे परिवाराने गेल्या अनेक वर्षापासून जनतेची सेवा प्रामाणिकपणे केली आहे. निवडणुकीतील निकाल काहीही असला, तरी जनतेचे प्रेम आणि पाठिंबा आमच्यासाठी सर्वांत मोठा बळ आहे. आम्ही हे प्रेम अधिक दृढ करण्यासाठी आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करत राहू.यावेळी माजी मंत्री आ.अर्जुनराव खोतकर व भाजपा जिल्हाध्यक्ष आ.नारायण कुचे यांनीही उपस्थित नागरिकांना व दानवे परिवाराला शुभेच्छा दिल्या. यावेळी जालना जिल्ह्यातील व शहरातील व्यापारी, डॉक्टर, वकील सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

पोलीस शहीद दिनानिमित्त वीर जवानांना अभिवादन

vishwatmaklokswamivarta

आसामच्या जोरहाट हवाई तळावर भारतीय हवाई दलाच्या एएन-३२ विमानाला अपघात, ५ जवानांना वीरमरण.

आपदा मित्र’ प्रशिक्षणासाठी नोंद करण्याचे आवाहन

मेळघाटाच्या डोंगरदऱ्यांत रंगला जिल्हा प्रशासनाचा ‘ट्रेकिंग’ अनुभव*ऐतिहासिक गाविलगड किल्ल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी..

vishwatmaklokswamivarta

शिक्षकांचे योगदान भारताला सुपर पॉवर बनवेल – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाराष्ट्रातील सहा शिक्षक ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५’ ने सन्मानित

vishwatmaklokswamivarta

राहुरी पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर