vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी नागरिकांना कालमर्यादेत सेवा द्यावी  – उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल

आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी नागरिकांना कालमर्यादेत सेवा द्यावी  – उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल

जालना, प्रतिनिधी :- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली सद्यस्थितीत जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी विहीत कालमर्यादेत नागरिकांना सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश दि. 11 सप्टेंबर 2025 रोजी जिल्ह्यातील सर्व आपले सरकार केंद्र चालकांच्या आयोजित दुरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या बैठकीत उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांनी दिले.

 दुरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीस नायब तहसीलदार राजू निहाळ, जिल्हा प्रकल्प प्रमुख प्रल्हाद तारख, अभियंता सुर्यकांत मगर, जिल्हा समन्वयक मंगेश जाधव यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती.

उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल म्हणाले की, सर्व केंद्रचालकांनी आपले सरकार सेवा केंद्र हे शासनाने नेमुन दिलेल्या जागेवर चालवावेत. केंद्र इतरत्र चालवत असल्याचे निर्देशनास आल्यास संबंधित केंद्र चालकावर कारवाई करण्यात येईल. नागरिकांचे अर्ज ऑनलाईन करतांना सर्व केंद्रचालकांनी नागरिकांचाच मोबाईल नंबर टाकणे अनिवार्य आहे. अर्जदार यांना त्यांचे अर्जाच्या स्थितीची माहिती एसएमएस व व्हॉटसअपद्वारे त्वरित उपलब्ध करून द्यावी. तसेच त्यांचे प्रमाणपत्र अर्जदार यांना त्यांचे व्हॉटसॲपवर उपलब्ध करून द्यावे. कोणीही प्रिंट काढून देणार नाही याबाबत खबरदारी घ्यावी. सर्व केंद्रचालकांनी केंद्रावर शासनाने दिलेल्या स्टँडर्ड नमुन्यातच केंद्राच्या दर्शनी भागातील बॅनर व दरपत्रक लावावे. जे केंद्रचालक आपले केंद्रावर शासनाचे दरपत्रक व सेवाविषयक बाबींचा तपशिल लावणार नाही. त्यांचे केंद्र बंद करण्यात येईल. सर्व सेवांची यादी, शुल्क व अपेक्षित कालावधी स्पष्टपणे फलकावर लावावा. कुणीही एजंटकडून व्हाटसअपवर डॉक्युमेंट मागवून फाईल ऑनलाईन करू नयेत. खोटी डॉक्युमेंट अपलोड करू नये. अशी बाब निदर्शनास आल्यास संबंधित केंद्र चालकाचे केंद्र तात्काळ रद्द करण्यात येवून, फौजदारी कार्यवाही करण्यात येईल. आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी सर्व व्यवहार कॅशलेश, ऑनलाईन पेमेंटचे प्राधान्याने करावेत. जेणेकरून पारदर्शकता आणता येईल. सर्व सेवांसाठी ठराविक शुल्कापेक्षा अधिक आकारणी होऊ नये. अशी बाब निर्देशनास आल्यावर संबंधित केंद्र चालकावर कारवाई करण्यात येईल. दोन प्रकारचे क्युआर कोड असून, एक विविध प्रमाणपत्राकरीता व एक नागरिकांच्या ऑनलाईन तक्रार नोंदविण्यासाठी आहे. सदर दोन्ही क्युआर कोडची प्रिंट सर्वांनी केंद्राच्या दर्शनीय भागावर लावावी. जेणेकरून नागरिकांस ऑनलाईन तक्रार करता येईल. सर्व केंद्रचालकांनी प्रतिक्रिया नोंदवही ठेवावी. तसेच त्यांनी दिलेल्या सेवाबाबतचा तपशिल नोंदवहीत ठेवणे अनिवार्य आहे. जेणेकरून शासनाचे तपासणीवेळी सदर नोंदवहीनुसार आपण दिलेल्या सेवांबाबत पडताळणी करणे सुलभ होईल. जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये मुलभूत सुविधा स्थापित कराव्यात. प्रत्येक केंद्रात सीसीटिव्ही कॅमेरे बसवून पारदर्शकता वाढविण्याबाबत निर्देशही देण्यात आले. यावेळी जिल्‌ह्यातील सर्व आपले सेवा केंद्रचालक ऑनलाईन उपस्थित होते.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कराड येथील प्रीती संगमावर जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी समाधी स्थळावर पुष्पांजली वाहून अभिवादन 

नवरात्रोत्सव विशेष वृत्तमालिका भाग 2 महिला व बालविकास विभागाच्या योजनांतून निवारा, आर्थिक मदत व कायदेशीर मदतीचा आधार महत्त्वाचे संपर्क क्रमांक वुमन हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 181 समस्याग्रस्त बालकांच्या मदतीसाठी टोल फ्री हेल्प लाईन 1098

vishwatmaklokswamivarta

कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात “राष्ट्रासाठी मध्यस्थी” विशेष मोहिमेला सुरुवात वाद नको, संवाद हवा! मध्यस्थीने सुटते गुंतागुंत, नाती राहतात जिवंत!

तंत्रज्ञानाच्या नव्या युगात – ‘एआय’चा वाढता प्रभाव- कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशोर जस्मानी

vishwatmaklokswamivarta

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !‘मनाचे श्लोक’ नावाचा चित्रपट म्हणजे संत वाड्मयाचा अपमान !चित्रपटाचे नाव न बदलल्यास हिंदू समाज चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही ! – हिंदु जनजागृती समितीचा इशारा