vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्हा प्रशासनाचे आवाहन जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता असल्याने दक्षता बाळगावी..

जिल्हा प्रशासनाचे आवाहन जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता असल्याने दक्षता बाळगावी..

 

जालना प्रतिनिधी: प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात दि. 14 ते 16 सप्टेंबर 2025 रोजी यलो अलर्ट जारी केला असुन तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी वारे, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (ताशी 30-40 कि.मी.प्र.ता. वेगाने) येण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच दि. 12 व 13 सप्टेंबर रोजी हलका ते स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

            मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांच्यापासून दूर रहावे,मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विद्युतवाहिनी अथवा ट्रॉन्सफार्मरजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अर्थातरी लटकणा-या / लोंबणा-या तारांपासून दूर रहावे.वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे, जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा.अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल तर सदर मालाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.

सर्व नागरिकांनी वादळी वारे, वीज पासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना 02482-223132 वर तसेच नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

यंदा राज्यात दहा ठिकाणी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन ब्राम्हण सभा, डोंबिवली पूर्व, मुंबई येथे भव्य संगीत दिवाळी पहाट सांस्कृतिक कार्यक्रम..

vishwatmaklokswamivarta

राज्यात धो-धो पावसामुळे चाळीसगाव सह  नांद्रे गावाला पुराचा वेढा; जामदा बंधारा  गिरणा नदीला पूरची शक्यता. 

vishwatmaklokswamivarta

सिरोंचा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दौरा,विविध योजनांचा आढावा व मार्गदर्शन

लातूर तालुक्यातील ११० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी उद्या ११ जुलै रोजी आरक्षण सोडत

महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम (नियमाधीन करणे श्रेणीवाद व नियंत्रण) अधिनियम, 2021 च्या अंमलबजावणीसाठी दिनांक 30 जून, 2026 पर्यंत मुदतवाढ बाबत

vishwatmaklokswamivarta

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta