vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून श्री साईबाबा समाधीचे दर्शन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून श्री साईबाबा समाधीचे दर्शन

अहिल्यानगर, प्रतिनिधी : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी गुरूस्थानचे दर्शन घेतले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले.

त्यांच्यासमवेत जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) गिरीश महाजन, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते.साईबाबा संस्थानच्यावतीने केंद्रीय मंत्री शाह यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

टपाली मतपत्रिकांच्या मोजणी प्रक्रियेत आणखी सुधारणा..

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेस लोकाभिमुख डिजीटल सेवेचा ‘स्मार्ट गव्हर्नन्स पुरस्कार’

vishwatmaklokswamivarta

अटकावून ठेवलेल्या जप्त वाहनांचा ई-लिलाव इच्छुकांनी ई-लिलाव प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा

युवा पिढीला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासून दूर राहाण्याचे आवाहन

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गतजालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 11 प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्ती आदेशांचे वितरण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीच्या जागावाटपाचं चित्र दोन दिवसात स्पष्ट होईल – मुख्यमंत्री

vishwatmaklokswamivarta