vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

अटकावून ठेवलेल्या जप्त वाहनांचा ई-लिलाव इच्छुकांनी ई-लिलाव प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा

अटकावून ठेवलेल्या जप्त वाहनांचा ई-लिलाव इच्छुकांनी ई-लिलाव प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा

 

रायगड( प्रतिनिधी:- मोटार वाहन कर न भरलेल्या वाहनांना मुंबई मोटार वाहन कर अधिनियमांतर्गत जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या वाहनांच्या वाहन मालकांना थकीत कर भरणा कळविण्यात आल्यानंतर देखील वाहन मालकांनी कर भरलेला नाही. अशा एकूण 44 वाहनांचा ई-लिलाव दि.7 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11.00 ते सायंकाळी 4.00 यावेळेत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल येथे होणार असून सर्व इच्छुकांनी ई-लिलाव प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा, असे आवाहन कराधान प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल जयंत चव्हाण यांनी केले आहे.

ई लिलावाच्या तारखेपर्यंत थकीतदारांना कर भरण्याची संधी राहील, याची वाहनाच्या मालकांनी, ताबेदारांना, वित्तदात्यांनी लिलावाचा दिनांकापर्यंत या कार्यालयात थकीत कर, पर्यावरण कर शासकीय दंडाच्या रकमेचा भरणा करून वाहने सोडून द्यावीत किंवा लिलावात हरकत घ्यायची असल्यास दि.19 मार्च 2025 पर्यंत लेखी हरकत घ्यावी. तद्नंतर आपले काही म्हणणे नाही असे गृहीत धरून वाहनांचा लिलाव हा ई-लिलाव पदध्दतीने करण्यात येईल. ई-लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी कार्यालयाच्या सूचना फलकांवर माहितीसाठी लावण्यात आली आहे. इच्छुकांनी वाहनांची प्रत्यक्ष पाहणी दि.24 मार्च 2025 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 6 पर्यंत वाहन अटकावून, जप्त असलेल्या ठिकाणी संपर्क करावा. अधिक माहितीसाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल येथे संपर्क साधावा.000000

संबंधित पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे आणि त्यांचे पुत्र डॉ.सुगत चंद्रिकापुरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला

vishwatmaklokswamivarta

मेळघाटातील कुपोषण नियंत्रणासाठी उपाययोजना करणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार,स्वयम योजनेसाठी अर्ज करावेत

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा प्रशासनातर्फे मार्गदर्शन शिबिर

vishwatmaklokswamivarta

प्रणवी भिसेचे संस्कृत स्पर्धेत यश

vishwatmaklokswamivarta