vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भाजपा जालना महानगरच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती एकता दौड ने साजरी..

भाजपा जालना महानगरच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती एकता दौड ने साजरी..

जालना (प्रतिनिधी) : भारताचे लोहपुरूष माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आज दि.३१ ऑक्टोबर रोजी जालना शहरात जालना महानगर भाजपाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून एकता दौड यात्रा घेऊन साजरी करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टी जालना जिल्ह्याचे माजी अध्यक्ष रामेश्वर पाटील भांदरगे, माजी जालना महानगर जिल्हाध्यक्ष अशोक आण्णा पांगारकर, माजी शहराध्यक्ष राजेश राऊत, प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय कामड, माजी नगरसेवक महावीर ढक्का माजी नगरसेविका सौ.संध्या देठे, सौ.कविता नागवे यांच्या प्रमुख उपस्थिती होती.

सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर हि एकता दौड यात्रा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते काद्राबाद-पाणीवेस-गरीबशाह बाजार-मस्तगड ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापर्यंत घेण्यात आली. यावेळी एकता दौड यात्रेमध्ये जालना पोलीस दलातील जवानासह शहरातील तरुण, युवा व जेष्ठ नागरिक, महिला बंधू भगिनीं यांनी सहभाग नोंदवला. यात्रा समारोपानंतर वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले व या नंतर झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.

यावेळी सर्वांना राष्ट्रीय एकता व अखंडतेची शपथ देण्यात आली व एक भारत श्रेष्ठ भारत ची घोषणा देण्यात आली. या कार्यक्रमास सिद्धिविनायक मुळे, धनराज काबलीये, सुनील खरे, महेश निकम, संजय भगत, देविदास देशमुख, आनंद वाघमारे, अर्जुन गेही, प्रभुदास ठाकूर, जगदीश भरतिया, जिवन सले, कपिल भूरेवाल, संदीप नाईकवाडे, आनंद झारकंडे, उमेश अग्रवाल, राज स्वामी, सुरेंद्र शेडूते, प्रा.राजेंद्र भोसले, डोंगरसिंग साबळे, रवी अग्रवाल, शिवराज जाधव, रोहित भूरेवाल, संजय देठे, कल्याण भदनेकर, राजेश देसार, अजय मिसाळ, गणेश जल्लेवार, राजेश जटावाले, संजय पाखरे, शिवराम सतकर, केदार लाड, रोहित नलावडे, नारायण गोगडे, योगेश सामलेटी, शाम उगले, गणेश पणबिसरे, विशाल उफाड, विवेक पाटील, भुतेकर इत्यादीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

शासकीय कामकाजाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आवश्यक‘टेक वारी – महा तंत्रज्ञान प्रशिक्षण सप्ताह’ मध्ये तज्ज्ञांचे मत…

जिल्हाधिकारी यांनी केली वेश्वी येथिल शासकीय रोपवाटिकेची पाहणी…

vishwatmaklokswamivarta

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जेजुरी येथे वारकऱ्यांना हायजिनिक किटचे वाटप

गोव्यात झालेल्या दूरसंचार विभागाच्या वार्षिक पश्चिम विभागीय परिषदेत उदयोन्मुख सुरक्षा विषयक समस्या आणि उपाययोजनांवर करण्यात आली चर्चा..

vishwatmaklokswamivarta

मराठी भाषा पंधरवडानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ‘पुस्तक प्रदर्शन, ‘विक्री’ आणि ‘ग्रंथदान’ उपक्रम; ग्रंथदान करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

राज्यातील काही भागात सध्या अंशतः ढगाळ हवामान- कर्नाटक व तेलंगणा सीमेलगत असलेल्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील सीमावर्ती भागात वादळी पावसाची शक्यता.. हवामान खात्याचा अंदाज