vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमोहत्सव सोहळ्यादिवशीच मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल टाकत शेतकऱ्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न

स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमोहत्सव सोहळ्यादिवशीच मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल टाकत शेतकऱ्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न. मुख्यमंत्र्याच्या भाषण संपताच.

मुंबई प्रतिनिधी :स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमोहत्सव सोहळ्यादिवशीच मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल टाकत शेतकऱ्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाषण संपवून निघाले होते. परिस्थितीचं गांभिर्य ओळखून पोलिसांनी वेळीच त्या शेतकऱ्याला रोखत मोठी दुर्घटना टाळली. मिळालेल्या माहितीनुसार, आत्मदहनाचा प्रयत्न करणारा शेतकरी जळगावचा आहे. या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून चौकशी सुरु आहे. रविवारी सकाळी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर काही वेळानंतर शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा हा प्रकार घडल्यानं खळबळ उडाली. या शेतकऱ्यानं असं का केलं? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

संबंधित पोस्ट

नवी मुंबईत परीक्षेच्या दिवशी 12वीचा विद्यार्थी बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा दाखल, तपास सुरू..

vishwatmaklokswamivarta

खरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत धान खरेदी योजना प्रभावीपणे राबविण्यास राज्य शासन कटिबद्ध – अग्रिम निधी वितरित

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील दादरच्या भाजी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता…

vishwatmaklokswamivarta

ऑनलाइन पेपरला कॉपी; मुंबई विद्यापीठ करतंय ऑफलाइन परीक्षेची तयारी

vishwatmaklokswamivarta

समुद्रातील जहाजातून डिझेलची तस्करी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या व नवी मुंबई पोलिसांनी जानेवारी महिन्यात पकडलेल्या २ बोटींना बुधवारी सकाळी अचानक आग लागल्याची घटना बेलापूर येथील जेटीत घडली

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-ब अराजपत्रित सेवा-संयुक्त परीक्षा २ फेब्रुवारी रोजी; २०६६४ उमेदवारांची बैठक व्यवस्था…

vishwatmaklokswamivarta