vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

तळेगाव येथील,समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 13 जाणांचा मृ्त्यू…

तळेगाव येथील,समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 13 जाणांचा मृ्त्यू…

: प्रतिनिधी  : समृद्धी महामार्गावर तळेगाव येथे भीषण अपघात  झाल्याची माहिती समोर येत आहे. लोखंडी सळई घेऊन जात असलेला ट्रक पलटी होऊन अपघात झाला असून या दुर्घटनेत तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या अपघातात काही मजूर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले आहे.

दुसरबीड येथून मजूर घेऊन समृद्धी महामार्गाच्या कामावर हे मजूर जात होते. त्यावेळी तळेगाव येथे हा अपघात झाला. समृद्धी महामार्गावर काम करणारे परप्रांतीय मजूर असल्याचे सांगण्यात येत आहे. एकूण ट्रकमध्ये 15 मजूर असल्याची प्राथमिक माहिती आहे. यापैकी 13 जणांचा मृत्यू झाल्याची वृत्त आहे.

बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम मोठ्या वेगात सुरू आहे. हा संपूर्ण महामार्ग लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठीच संपूर्ण महामार्गावर ठिकठिकाणी वेगाने महामार्गाचे काम सुरू आहे. शिर्डी ते नागपूर हा मार्ग दोन महिन्यात वाहतुकीला खुला करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे.

संबंधित पोस्ट

भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांची मुलगी आणि नेव्ही चिल्ड्रन स्कूलची माजी विद्यार्थिनी काम्या कार्तिकेयन हिनं रचला नवा इतिहास. 

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने देशातील वीस मुलांचा सन्मान; महाराष्ट्राच्या अर्णव महर्षीचा समावेश

vishwatmaklokswamivarta

रेल्वे परीक्षा घोटाळा: विद्यार्थ्यांचा प्रचंड गोंधळ, दगडफेक पॅसेंजर ट्रेनला लावली आग

vishwatmaklokswamivarta

: मराठा आरक्षण : कायदेशीर पर्यायांबाबत शिफारसीसह समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर

कॉमेडियन राजू श्रीवास्तव च्या अफवा थांबवा, राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले नाही, व्हायरल वृत्त चुकीचे; शेखर सुमन यांचे आवाहन..

माझी निवडणूक जनतेने हातात घेतलीय : लाखोंच्या फरकाने निवडून येणार – महादेव जानकर महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत वडीगोद्रीत महादेव जानकर जाहीर सभा  

vishwatmaklokswamivarta