
भारतीय हवाई दलाचे C-17 विमान आज सकाळी अफगाणिस्तानच्या काबुलमधून उड्डाण करीत गाझीयाबादच्या हिंडन हवाई तळावर उतरले…
नवी दिल्ली- प्रतिनिधी भारतीय हवाई दलाचे C-17 विमान आज सकाळी अफगाणिस्तानच्या काबुलमधून उड्डाण करीत गाझीयाबादच्या हिंडन हवाई तळावर उतरले आहे. या विमानात 168 प्रवासी होते, यात 107 भारतीय नागरिक आहेत. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. अनेक भारतीय अफगाणिस्तानमध्ये अडकले आहेत. त्यांना भारतात आणण्याचे काम सुरु आहे. आज सकाळी 87 प्रवाशांना घेऊन एक विमान भारतात पोहोचले होते. भारतीय हवाई दलाचे C-17 विमान आज सकाळी पाच वाजता 168 प्रवाशांसह काबूलमधून उड्डाण केले होते. हे विमान गाझीयाबादमधील हिंडन या भारतीय हवाई दलाच्या तळावर दहाच्या सुमारास पोहोचले. 168 प्रवाशांमध्ये 107 भारतीय आहेत, तर काही अफगाण नागरिक आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंधम बागची यांनी ट्विट करुन यांसदर्भातील माहिती दिली. माहितीनुसार, आणखी काही भारतीय अफगाणिस्तानमध्ये अडकले आहेत. त्यांना मायदेशी परत आणण्याचे प्रयत्न भारत सरकारकडून केले जात आहेत.



