vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

माफिया डॉन अरुण गवळी यांच्या दोन्ही मुली, गीता आणि योगिता गवळी येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अखिल भारतीय सेनेच्या तिकिटावर निवडणूक लढणार

माफिया डॉन अरुण गवळी यांच्या दोन्ही मुली, गीता आणि योगिता गवळी येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अखिल भारतीय सेनेच्या तिकिटावर निवडणूक लढणार…

मुंबई प्रतिनिधी-

माफिया डॉन अरुण गवळी यांच्या दोन्ही मुली, गीता आणि योगिता गवळी येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अखिल भारतीय सेनेच्या तिकिटावर निवडणूक लढणार आहेत. गीता गवळी यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाईल. अरुण गवळी मात्र या प्रक्रियेत सहभागी नसतील, अशी माहिती गीता गवळी यांनी दिली. दरम्यान, भायखळा विधानसभा मतदारसंघात गवळी कुटुंबाचा प्रभाव असल्याने या मतदारसंघातील निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे.

गीता गवळी यांच्या भाजपात प्रवेशाच्या चर्चा :गीता गवळी या अरुण गवळी यांच्या थोरल्या कन्या आणि माजी नगरसेविका आहेत. त्यांनी 2017 च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 212 मधून विजय मिळवला होता. आता त्या पुन्हा त्याच प्रभागातून निवडणूक लढवणार आहेत. गेल्या काही काळात गीता गवळी यांच्या भाजपात प्रवेशाच्या चर्चा होत्या, परंतु त्यांनी या अफवा खोडून काढत अखिल भारतीय सेनेच्या तिकिटावरच निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

कोण आहेत योगिता गवळी? : योगिता गवळी या अरुण गवळी यांच्या धाकट्या कन्या असून, त्या प्रथमच राजकारणात पदार्पण करत आहेत. त्या प्रभाग क्रमांक 204 मधून निवडणूक लढवणार आहेत. या प्रभागातून यापूर्वी अखिल भारतीय सेनेच्या वंदना गवळी नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र, त्यांनी अलीकडे शिवसेनेत प्रवेश केल्याने त्या जागेवर योगिता गवळी यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. योगिता यांना राजकीय अनुभव नसला तरी, भायखळा परिसरातील पक्षाचा प्रभाव त्यांना लाभदायक ठरू शकतो.

माफिया डॉन अरुण गवळी यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय सेनेचा भायखळा परिसरात प्रभाव आहे. 2017 च्या मुंबई पालिका निवडणुकीत पक्षाने प्रभाग क्रमांक 204 आणि 212 मधून दोन जागांवर विजय मिळवला होता. माजी नगरसेविका वंदना गवळी यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे पक्षाला धक्का बसला असला, तरी गीता गवळी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पुन्हा मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या निवडणुकीत गीता आणि योगिता गवळी यांच्या उमेदवारीमुळे भायखळा परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. गवळी कुटुंबाच्या प्रभावामुळे आणि पक्षाच्या स्थानिक पकडीमुळे ही निवडणूक अखिल भारतीय सेनेसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

000000

0

संबंधित पोस्ट

नाशिक येथील गृहनिर्माण कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

कॉपीमुक्त अभियानाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागांची सामुहिक जबाबदारी-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

सणासुदीच्या काळात केंद्राकडून एक आगाऊ हप्ता म्हणून महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पंतप्रधान आणि केंद्रीय वित्तमंत्र्यांचे आभार

जिल्हा परिषदेमार्फत जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन पशुपालकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन.. जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनात १६० पशुपक्ष्यांचा समावेश

vishwatmaklokswamivarta

पाणी व्यवस्थापनाद्वारे दीर्घकालीन शाश्वत उपाययोजनांची अंमलबजावणी करावी- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 अंतर्गत कार्यक्रमात प्रतिपादन- जलसाक्षरता, पाणीबचत, पुनर्वापरासाठी जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यातून दिशा…

साखर कारखान्यानी शेतकऱ्यांच्या ऊसाला अधिकाधिक दर देण्याचा प्रयत्न करावा -कृषी मंत्री दत्तात्रय भरणे कृषिमंत्र्यांच्या हस्ते द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या ७० व्या वार्षिक अधिवेशन आणि साखर प्रदर्शनाच्या उद्घाटन

vishwatmaklokswamivarta