vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दिव्यांग बालकांच्या तपासणीचा पायलट प्रकल्प, १४४ बालकांची तपासणी

दिव्यांग बालकांच्या तपासणीचा पायलट प्रकल्प, १४४ बालकांची तपासणी

 छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी– शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ‘घाटी’ येथे शनिवारी (दि.२१) बालकांच्या दिव्यांगत्व तपासणी व निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात १४४ दिव्यांग बालकांची तपासणी करण्यात आली, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून देण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथे हा पायलट प्रकल्प राबविण्यात आल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर, दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगत्वाचे निदान व तपासणी शिबिराचे आयोजन शनिवारी (दि.२१) जिल्हा रुग्णालय घाटी येथील बाह्य रुग्ण विभाग येथे करण्यात आले.    उद्घाटन सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वैशाली प्रशांत फडणीस यांनी केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे, अधीक्षक श्रीमती गायत्री तळवडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.जितेंद्र डोंगरे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी श्रीमती रेशमा चिमंद्रे, समाज कल्याण प्रादेशिक दिव्यांग उपायुक्त दीपक खरात यावेळी उपस्थित होते.

शिबिरात १४४ दिव्यांग बालकांनी तपासणी करण्यात आली. त्यात अस्थिव्यंग – २७, मानसोपचार – ४५, कान नाक व घसा – २०, बालरोग – ३९, नेत्र – १३ यांचा समावेश आहे. यापैकी ३ बालकांना शिबिरातच दिव्यांग विशेष ओळखपत्र (UDID) देण्यात आले, तर ३७ बालकांची UDID प्रक्रिया पुढील आठवड्यात पूर्ण करण्यात येणार आहे. उर्वरित बालकांना पुढील तपासणीसाठी बोलावण्यात आले आहे,असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने कळविले आहे

०००००

संबंधित पोस्ट

राज्यपालांच्या हस्ते १०६ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस पदक प्रदान…

मुंबईतील टॉप डिजिटल पोस्टर बॅनर तयार करणाऱ्या एस.एस.पी.क्रिएशन च्या  तृतीय वर्षात वाटचाल…

vishwatmaklokswamivarta

बंदीजना करीता मध्यवर्ती कारागृहत  ‘जीवन जगण्याची कला’ शिबिर संपन्न

मेहकर बसस्थानकाचे लोकार्पण; एसटीच्या आधुनिकीकरणाचा नवा टप्पा सुरू – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ३० नवीन बसेस लवकर उपलब्ध होणार

पत्रकारांची लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी असावी – उपमुख्यमंत्री अजित पवार*

सांगली जिल्हा पंचायत समिती सभापती आरक्षण-2025 जाहीर

vishwatmaklokswamivarta