vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

साखर कारखान्यांनी लाभधारकांची पाणीपट्टी जमा करावी- कार्यकारी अभियंता रा. य. रेड्डीयार

साखर कारखान्यांनी लाभधारकांची पाणीपट्टी जमा करावी- कार्यकारी अभियंता रा. य. रेड्डीयार

        सांगली, प्रतिनिधी) : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन अंतर्गत लाभधारकांच्या ऊस क्षेत्राची पाणीपट्टी कपात शासकीय महसूल अंतर्गत जमा करणे आवश्यक आहे. तरी सिंचन योजना सुरळीतपणे चालू ठेवण्याकामी प्रशासकीय दृष्ट्या लाभक्षेत्रातील सर्व साखर कारखान्यांनी सर्वच लाभधारकांच्या ऊस क्षेत्राची पाणीपट्टी कपात करावी. तसेच, ज्या लाभधारकांनी कारखान्यांकडे पाणीपट्टी जमा केली आहे, त्यांची व कपात केलेली पाणीपट्टी जमा करून सहकार्य करावे, असे टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभाग ओगलेवाडी चे कार्यकारी अभियंता रा. य. रेड्डीयार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभाग, ओगलेवाडी अंतर्गत टेंभू प्रकल्प, आरफळ कालवा, कृष्णा कालवा, मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प या सर्व प्रकल्पाच्या सिंचन वर्ष 2023-24 मधील खरीप, रब्बी, उन्हाळी हंगामामध्ये सोडण्यात आलेल्या पाण्याची पाणीपट्टी कपात ही कारखान्यांमार्फत केली जाते. तथापि, काही लाभधारक पाणीपट्टी न भरता ते लाभक्षेत्राबाहेरील साखर कारखान्यांना गाळपासाठी ऊस घालवितात. ही बाब सांगली येथे सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली येथे सर्व साखर कारखान्यांचे संचालक, चेअरमन यांच्या समवेत दिनांक 2 जानेवारी 2025 रोजीच्या आढावा बैठकीमध्ये गांभिर्याने घेण्यात आली आहे. जे लाभधारक अशा प्रकारे पाणीपट्टी न भरता लाभक्षेत्राबाहेरील साखर कारखान्यांना गाळपासाठी ऊस देत असल्यास त्यांची पाणीपट्टी आकारणी करण्यात येऊन त्यांचे 7/12 वर महसूल खात्यामार्फत बोजा नोंद चढवण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे याबाबत बैठकीमध्ये सहमती दर्शविली आहे, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.00000

संबंधित पोस्ट

मागास भागातील समुदायाचे कल्याण आणि समृद्धी साधण्यास प्राधान्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या पुढाकाराने एटापल्ली तालुक्यात बाएफ संस्थेमार्फत कार्यान्वित प्रकल्पामुळे रोजगार संधीत वाढ, समुदाय कल्याण पूरक उपक्रमात स्थानिकांचा सक्रिय सहभाग..

शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांच्या पाठपुराव्यामुळे दशकांपासूनचा विजेचा अडथळा दुरमहावितरण विभागाकडून विविध ठिकाणी नवीन पोल बसवले विजेच्या तारांना सुरक्षित उंची देत बससेवेचा मार्ग मोकळा

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग बांधवांनी दिव्यांगत्व प्रमाणपत्रासाठी येताना सर्व आवश्यक कागदपत्रांसह यावे-जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निशिकांत पाटील

vishwatmaklokswamivarta

विकसित कृषी संकल्प यात्रा’शेतकऱ्यांमध्ये कृषी तंत्रज्ञानाची जनजागृती करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री संत तुकाराम महाराज व श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन ‘राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी राहू दे’; मुख्यमंत्री फडणवीस यांचे साकडे

vishwatmaklokswamivarta

राज्यात अनधिकृत कत्तलखान्यातील गोहत्या बंदीसाठी विशेष मोहीम- गृहराज्यमंत्री योगेश कदम..