
महाराष्ट्रातल्या या महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढले. बलात्कार वाढले. दिशा सालियनच्या आत्महत्त्या प्रकरणात कोण मंत्री होता? पूजा चव्हाण प्रकरणात कोण होता? सर्वांचा पाठपुरावा करणार..केद्रीय मंत्री नारायण राणे.
महाराष्ट्रातल्या या महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढले. बलात्कार वाढले. दिशा सालियनच्या आत्महत्त्या प्रकरणात कोण मंत्री होता? पूजा चव्हाण प्रकरणात कोण होता? सर्वांचा पाठपुरावा करणार.. हे आत जाईपर्यंत.. सनदशीर मार्गाने.. कायदेशीररित्या.., असा इशारा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिला.
मी बोललो ते राष्ट्राच्या अभिमानामुळे. त्यावर प्रतिक्रिया देता. चिपळूणमध्ये प्रचंड गर्दी… किती माणसे- १७.. एका कोपऱ्यात घोषणा देणारे.. किती.. १३.. मुद्दाम मोजले मी. घरावर किती जण आले? मारायला की मार खायला, ते माहित नाही. आम्ही तिघेही घरी नव्हतो. पण, अशा प्रतिक्रियांना मी घाबरत नाही. अपशब्दाला नाहीच नाही. शिवसेना वाढविण्यात माझाही सहभाग होता, असेही ते म्हणाले.
कोथळा कसा असतो ते दाखवावे लागेल..
हे महाराष्ट्र अधोगतीकडे चालले आहे. कोरोना काळात देशातल्या मृतांपैकी एक तृतीयांश म्हणजे जवळजवळ एक लाख ५७ हजारांहून जास्त लोक मृत्यूमुखी पडले. फार सभ्य लोक आहेत हे.. आत्महत्त्येला प्रवृत्त करतात. औषधखरेदीत पैसे खातात. सर्व काही बाहेर आले पाहिजे. माझ्यावर कारवाई करण्याचे आदेश देणारे अनिल परब गृहमंत्री आहेत का? त्याविरूद्ध आपण न्यायालयात जाणार आहोत, असेही राणे म्हणाले.
शिवसेनेचे आमदार बांगर यांनी कोथळा काढण्याची धमकी दिली आहे, त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, यांनी उंदीर मारला का आधी.. ते विचारा.. त्यांना कोथळा कसा असतो, कसा काढतात हे दाखवावे लागेल..
उद्धव ठाकरे यांच्या या विधानांचे काय?
मी काय असे बोललो ज्याचा यांना एव्हढा राग आला? आता न्यायालयात विषय आहे म्हणून पुढे बोलणार नाही. गेल्या ५२ वर्षांच्या राजकीय जीवनात असा प्रसंग घडला नाही. आणि या काळात शिवसेनेच्या नेत्यांची वक्तव्ये काय आली आहेत हे पाहा. मी सेनाभवनाबाहेर महिलांवर हात टाकण्याच्या घटनेवर बोललो. त्यावर हे मुख्यमंत्री काय म्हणाले? सेनाभवनावर कोण बोलेल त्याचे थोबाड फोडा… उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथवर बोलताना ते म्हणाले की, हा योगी आहे का ढोंगी, याला चपलाने मारले पाहिजे.. ही भाषा आहे का? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बंद दाराआड झालेली बोलणी निर्लज्जपणे बाहेर मांडली. मी मुद्दाम निर्लज्ज हा शब्द वापरला.. असे मुख्यमंत्र्यांचे बोलणे? मुद्दाम बोलतो, असे ते म्हणतात.. यांना मुख्यमंत्री बनवणाऱ्या शरद पवारांना सांगा यांचा सज्जनपणा आणि सालसपणा.., असा टोलाही नारायण राणे यांनी हाणला.
महाड व उच्च न्यायालयातही आपल्या बाजूनेच कौल
कालच्या घटनेबद्दल महाडचे न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयातून आपल्याच बाजूने कौल आला. यामुळे देश कायद्याने चालतो हे सिद्ध झाले आहे. १७ सप्टेंबरपर्यंत मी त्यावर काही भाष्य करणार नाही. या प्रकरणात संपूर्ण भाजपा माझ्या पाठिशी उभा राहिला आहे. माझ्या काही मित्रांनी या जन आशिर्वाद यात्रेविरूद्ध लढा उभा केला. पण त्यांना मी पुरून उरलो, असेही ते म्हणाले.
शुक्रवारपासून पुन्हा जन आशिर्वाद यात्रा
कालच्या घटनेमुळे थांबविण्यात आलेली भारतीय जनता पार्टीची जन आशिर्वाद यात्रा शुक्रवारपासून सिंधुदूर्गातून पुन्हा सुरू होईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली



