vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता २१ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता २१ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, प्रतिनिधी : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत देण्यात येणारे महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार आणि क्रांतीवीर राजे उमाजी नाईक या पुरस्कारांसाठी सन २०२५-२६ वर्षाकरिता इच्छुक व्यक्ती व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी व्यक्ती व संस्थांनी २१ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज करावे असे आवाहन सहसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय यांनी केले आहे.

पुरस्कारासाठी अटी व शर्ती :- अर्जदार व्यक्ती, संस्था महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराने संबंधित समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अथवा अन्य क्षेत्रातील उत्थानासाठी सलग व उल्लेखनीय स्वरूपाचे कार्य केलेले असावे. अर्ज विहित नमुन्यात सादर करणे बंधनकारक असून शासन निर्णयात नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे, कार्याचा सविस्तर अहवाल, शिफारस पत्रे व प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अपूर्ण, चुकीची माहिती असलेले अथवा मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतले जाणार नाहीत. पुरस्काराबाबत अंतिम निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.

पुरस्कारासाठीचे अर्ज संबंधित जिल्ह्याचे सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग येथे २१ फेब्रुवारी २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत करणे आवश्यक आहे. अर्जाचा नमुना, शासन निर्णयातील सविस्तर अटी व शर्ती तसेच अधिक माहिती सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, जिल्हा कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे.

पात्र व इच्छुक व्यक्ती व संस्थांनी विहित मुदतीत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाने केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा अभिषेक सोहळा याचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त पूजा अर्चना करून प्रसाद वाटप भाजपाने धारावी विभागात केले

vishwatmaklokswamivarta

महावीर चौकात हिरव्या झेंड्याविरोधात जैन समाजाने प्रशासनाकडे निवेदन… 

vishwatmaklokswamivarta

गोवंडीच्या बेंगणवाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,एच .एम. फाउंडेशन ,आणि डॉ. आर. एन . कपूर रुग्णालय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन

vishwatmaklokswamivarta

महसूल वसुली पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे – विभागीय आयुक्त श्वेता सिंघल

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट

vishwatmaklokswamivarta

विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील-घाट परिसरात 25-26 जुलै रोजी मुसळधार पावसाचा अंदाज…विदर्भ (प्रामुख्याने पूर्व विदर्भ) आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात धरण साठ्यात वाढ आणि नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे

vishwatmaklokswamivarta