vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मंत्री, आमदार, खासदार, अधिकाऱ्यांना चौकशीपासून संरक्षण; माेदी सरकारने काढले आदेश

सनदी अधिकारी आणि उच्चाधिकाऱ्यांचा भविष्यात छळ हाेऊ नये, यासाठी माेदी सरकारने संरक्षण दिले आहे. काेणाची चाैकशी काेणत्या दर्जाचा अधिकारी करेल, याबाबत सरकारने नियमावली जारी केली

मंत्री, आमदार, खासदार, अधिकाऱ्यांना चौकशीपासून संरक्षण; माेदी सरकारने काढले आदेश

नवी दिल्ली: प्रतिनिधी :  सनदी अधिकारी आणि उच्चाधिकाऱ्यांचा भविष्यात छळ हाेऊ नये, यासाठी माेदी सरकारने संरक्षण दिले आहे. काेणाची चाैकशी काेणत्या दर्जाचा अधिकारी करेल, याबाबत सरकारने नियमावली जारी केली आहे. केवळ अधिकारीच नव्हे तर सर्व केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, खासदार, मुख्यमंत्री, आमदार तसेच सार्वजनिक कंपन्यांचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांना माेदी सरकारने एक आदेश काढून अभूतपूर्व संरक्षण दिले आहे.

विकास मार्गावर निर्णय प्रक्रिया गतिमान करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. आराेपांची चाैकशी पाेलीस महासंचालक किंवा समकक्ष दर्जाच्या अधिकाऱ्यांनीच करावी, असे या आदेशात आहे.

यामुळे काढले आदेश

सरकारी बाबूंमध्ये सीबीआय, सीव्हीसी यासारख्या तपास यंत्रणांसह राज्य सरकारच्या चाैकशांमुळे भीती निर्माण झाली आहे. त्यांच्यात विश्वास निर्माण व्हावा, यासाठी केंद्र सरकारचा हा प्रयत्न आहे. हे अधिकारी स्वत: निर्णय घेत नाहीत. आपापल्या विभागातील राजकीय साहेबांचे ते आदेश घेत असतात. मात्र, त्यांचा सेवेत असताना किंवा निवृत्तीनंतर चाैकशीच्या नावाखाली छळ हाेताे.

अकारण त्रास टाळण्याचा हेतू

केंद्र सरकारने केलेल्या विभागणीनुसार, १४ आणि १५ व्या श्रेणीतील सरकारी अधिकारी तसेच सार्वजनिक कंपन्यांच्या संचालकांची चाैकशी अतिरिक्त पाेलीस महासंचालक दर्जाचा अधिकारीच करु शकेल. मंत्री, खासदार, आमदार, सरकारी अधिकाऱ्यांविराेधातील तक्रारींची चाैकशी सुरू हाेते. मात्र, अनेकदा दाेष नसतानाही अधिकाऱ्यांना चाैकशीमुळे त्रास हाेताे. त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न माेदी सरकारने केला आहे.

अनेकांचे पंख छाटले,

प्रत्येक पदासाठी विभागणी केल्यामुळे पाेलीस निरीक्षकांसारख्या अधिकाऱ्यांचे पंख छाटले आहेत. एखाद्या प्रकरणात त्यांना थेट चाैकशी करता येणार नाही.

पदांनुसार चौकशीसाठी विभागणी

सर्व राज्ये आणि तपास यंत्रणांनी याबाबत खबरदारी घेण्याचे निर्देश माेदी सरकारने दिले आहेत. या आदेशामध्ये सरकारने ‘एसओपी’ जारी केली आहे. वेगवेगळ्या पदावरील अधिकाऱ्यांची वेगवेगळ्या पदावरील पाेलीस अधिकारी चाैकशी करतील, असे त्यात म्हटले आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्यातील पंढरपूर, देहू, आळंदी, पैठणसह सर्व मंदिरे-तीर्थक्षेत्रे ‘मद्य-मांस मुक्त’ करावीत ! – पंढरपूर येथे वारकरी अधिवेशनात एकमुखी मागणी..

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाच्या वतीने शिस्तबद्ध आणि सन्मानपूर्वक तिकीट तपासणीची नवी परिभाषा रचण्याच्या उद्देशाने नमस्ते अभियानाचा प्रारंभ

मेडिक्लेमची रक्कम मिळण्यासाठी रुग्णालयात अ‍ॅडमिट होण्याची गरज नाही; कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय…

सिकलसेल व थॅलेसेमिया रुग्णांसाठी अत्याधुनिक उपचार सुविधांची निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासकीय वैद्यकीय रुग्णालयात विविध प्रकल्पांचे लोकार्पण

विशेष लेख :युवकांना रोजगार संधीदेणारी – ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’

अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार रिक्त पदे लवकरच भरणार- महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे