
मुंबईत मालाड येथे महिला जेष्ठ नागरिक महिलेला टॉयलेटमध्ये डांबून, चार लाख रुपये लुटले ची घटना.
मुंबई: प्रतिनिधी मालाड मध्ये एकट्या वयोवृद्ध महिलेला घराच्या टॉयलेट मध्ये डांबून आरोपींनी लाखो रुपये लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन अनोळखी व्यक्ती दुपारच्या सुमारास वृद्ध महिला घरात एकटी असल्याचे पाहून घरात शिरले.
त्यानंतर त्यांनी ६० वर्षीय वृद्ध महिलेला टॉयलेटमध्ये डांबून घर लुटलं. या प्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
महिलेच्या घरातून ४ लाखांचा ऐवज चोरांनी पळवला. मालाडच्या लोकमान्य टिळक वाचनालयामागे झकेरिया रोडवरील वसंत व्ह्यु इमारतीत महिला रहात होती.



