vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

अफगाणिस्तानात पंजशीरवर तालाबिनाचा ताबा नाहीच; अमरुल्ला सालेह कार्यवाहक राष्ट्रपती

पंजशीरवर तालाबिनाचा ताबा नाहीच; अमरुल्ला सालेह.

काबूल प्रतिनिधी  – अफगाणिस्तानमध्ये आता पंजशीरसुद्धा ताब्यात घेतल्याचा दावा तालिबानने शुक्रवारी केला. याबाबतचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. त्यात म्हटलं आहे की, आता पंजशीरसुद्धा तालिबानच्या ताब्यात गेलं आहे. एवढंच नाही तर स्वत:ला अफगाणिस्तानचा राष्ट्रपती घोषित केलेले अमरुल्ला सालेहसुद्धा पंजशीरमधून पळून गेले आहेत. दरम्यान, आता तालिबानला आव्हान देणारे अमरुल्ला सालेह यांनी एक व्हिडिओ प्रसारीत केला आहे. त्यात सालेह यांनी म्हटलं आहे की, मी देश सोडून पळालो नाहीय. पंजशीरच्या खोऱ्यातच आहे आणि रेजिस्टंट फोर्सच्या कमांडर्स आणि राजकीय नेत्यांसोबत आहे.

अमरुल्ला सालेह यांनी तालिबानने ताबा मिळवल्याची चर्चा फेटाळून लावली आहे. तसंच म्हटलं की, पंजशीर खोऱ्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून तालिबान आणि इतर संघटनांकडून हल्ले केले जात आहेत. मात्र त्यांना कोणत्याही भागावर ताबा मिळवता आलेला नाही. काही माध्यमांनी असेही वृत्त दिले की, मी देशातून पळून गेलो. पण हे वृत्त तथ्यहीन आहे. हा माझा आवाज आहे आणि पंजशरी खोऱ्यातून कॉल करत आहे. मी आपल्या कमांडर्स आणि राजकीय नेत्यांसोबत इथेच आहे

तालिबानच्या हल्ल्याबद्दल बोलताना अमरुल्ला सालेह यांनी सांगितलं की, आम्ही परिस्थितीची माहिती घेत आहे. नक्कीच हा कठीण काळ आहे. तालिबान, पाकिस्तानी आणि अलकायदासह इतर दहशतवादी आक्रमण करत आहेत. आमच्या भागावर आमचा ताबा आहे आणि अजुनही आम्ही तो गमावलेला नाही. गेल्या चार पाच दिवसांपासून तालिबानने आक्रमण वाढवले आहे. मात्र अजुनही त्यांना यश मिळालेलं नाही. या हल्ल्यात काही त्यांचे आणि काही आमचे लोक मारले गेले आहेत.

संबंधित पोस्ट

इशरत जहांचे समर्थक जितेंद्र आव्हाड स्वतःला वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजतात का?‘मनुस्मृती’चे दहन केल्यास आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंदवा ! – हिंदु जनजागृती समिती 

vishwatmaklokswamivarta

प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या  मारेकऱ्यांसोबत पंजाब पोलिसांचे  एन्काऊन्टर दोन गँगस्टर ठार

vishwatmaklokswamivarta

2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठीआपण सर्वांनी मिळून यासाठी प्रयत्न करायला हवेत   – जागृती सिंगला

vishwatmaklokswamivarta

नांदेड : गोदावरी महामहोत्सवाला आजपासून सुरुवात

vishwatmaklokswamivarta

जिल्हाभरात शाळाप्रवेशाचा उत्सव पालकमंत्री, मंत्री, जिल्हाधिकारी उच्चपदस्थांनी केले शाळेतल्या पहिल्या पावलाचे स्वागत…

महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल – आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

vishwatmaklokswamivarta