
प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या मारेकऱ्यांसोबत पंजाब पोलिसांचे एन्काऊन्टर दोन गँगस्टर ठार…
पंजाब प्रतिनिधी:
प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या संशयीत मारेकऱ्यांसोबत पंजाब पोलिसांचे सध्या अमृतसर इथं एन्काऊन्टर सुरु आहे. पोलीस आणि दोन गँगस्टर यांच्यात ही धुमश्चक्री सुरु असून यामध्ये 2 ठार असून एक पत्रकार जखमी झाला आहे. या घटनेचा व्हिडिओही एएनआयनं ट्विट केला आहे. हे दोन्ही गँगस्टर सिद्धू मुसेवाला याच्या हत्येतील आरोपी असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पंजाब पोलिसांच्या अँटिगँगस्टर टास्क फोर्सची ही मोहिम भखना गावात सुरु आहे. ज्या दोन गँगस्टर्सना पोलिसांनी घेरलं आहे. यामध्ये जगरुप सिंग रुपा आणि मनप्रितसिंग ऊर्फ मन्नू कुसा या आरोपींचा समावेश आहे. या दोघांचा सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमध्ये थेट सहभाग असल्याचंही पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. पंजाब पोलीस आणि दोन यांच्यामध्ये सकाळपासून एन्काऊंटर सुरुर होता त्याच्यामध्ये अनेक गोळ्या वर्षाव या आरोपींना मार्फत करण्यात आला होता त्याला प्रत्युत्तर देत पोलिसांनी दोन आरोपीना या झालेल्या चकमकीमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे
गायक शुभदीपसिंग सिद्धू ऊर्फ सिद्धू मुसेवाला याची पंजाबच्या मानसा जिल्ह्यात २९ मे २०२२ रोजी काही लोकांनी गोळ्यांची वर्षाव करत हत्या केली होती.



