vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

जन्म त्रिशताब्दी निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चर्चगेट स्थानकाजवळील पुतळ्याचे सुशोभीकरण,• महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय• महेश्वर येथील राजवाडा, इंदोर येथील वास्तूशिल्प, काशीविश्वनाथ मंदिराचा केलेला जीर्णोध्दार कलात्मक स्वरुपात साकारणार..

जन्म त्रिशताब्दी निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चर्चगेट स्थानकाजवळील पुतळ्याचे सुशोभीकरण,• महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय• महेश्वर येथील राजवाडा, इंदोर येथील वास्तूशिल्प, काशीविश्वनाथ मंदिराचा केलेला जीर्णोध्दार कलात्मक स्वरुपात साकारणार..

मुंबई, प्रतिनिधी: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चर्चगेट स्टेशन जवळ असलेल्या पुतळ्याचे आणि परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. पुतळ्याचे दुरुस्तीकार्य तसेच पाठीमागील भिंतीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले कार्य, महेश्वर येथील राजवाडा, इंदोर येथील वास्तूशिल्प, काशीविश्वनाथ मंदिराचा केलेला जीर्णोध्दार, वृक्षसंवर्धन याबाबींचा देखावा आकर्षक स्वरुपातील प्रकाश योजनेसह मांडण्यात येणार आहे. आज महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महापालिका सहायक आयुक्त श्री.जयदीप मोरे आणि अन्य अधिकारी तसेच डॉ.असिम गोकर्ण हरवंश यांची या कामासंदर्भात बैठक झाली. हे काम दिनांक १५ मे, २०२५ च्या आत पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. दिनांक ३१ मे, २०२५ रोजी पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती आहे. या जन्म त्रिशताब्दी निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा हा सुशोभीत आणि पुष्पमंडित पुतळा तयार करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करावी – मंत्री ॲड. आकाश फुंडकर रायगडमधील गार्गी हुट्टेनेस अल्बर्टस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील कामगार प्रश्नांबाबत बैठक

मैदान गाजवले, मनेही जिंकली; महसूल क्रीडा स्पर्धेत जालना जिल्ह्याचा डंका • जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या प्रत्यक्ष सहभागाने खेळाडूंमध्ये संचारले नवचैतन्य 

नमुंमपा जिल्हा स्तरीय शालेय जलतरण स्पर्धेला आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते उत्साहात प्रारंभ राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त नामांकित जलतरणपटू श्री शुभम वनमाळी यांची विशेष उपस्थिती..

vishwatmaklokswamivarta

भूकंपविषयक आपत्ती व्यवस्थापनाची १७ फेब्रुवारी रोजी रंगीत तालीम; नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन• राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक राहणार उपस्थित

vishwatmaklokswamivarta

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करून देशाची निर्यात वाढवण्यावर भर द्यावा; वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील परिषदेत तज्ज्ञांचे आवाहन

महसूलविषयक सुधारित कार्यपद्धतींची अंमलबजावणी १५ ऑगस्टपासून- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल क्षेत्रीय अधिकारी कार्यशाळेत मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन