vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मोरगावच्या मयुरेश्‍वराप्रमाणे साजरा होणारा.गणेशोत्सवाआधी दोन दिवस सुरू…

मोरगावच्या मयुरेश्‍वराप्रमाणे साजरा होणारा.गणेशोत्सवाआधी दोन दिवस सुरू…

देवरूख प्रतिनिधी : मोरगावच्या मयुरेश्‍वराप्रमाणे साजरा होणारा आणि कोकणातील गणेशोत्सवाची सुरवात म्हणून प्रसिद्ध असलेला तसेच भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी असा पाच दिवस चालणारा देवरूखच्या चौसोपी वाड्यातील गणेशोत्सवाला या वर्षी ७ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे.नियमित गणेशोत्सवाआधी दोन दिवस सुरू होणारा हा उत्सव गेली ३७५ वर्षे अव्याहतपणे सुरू आहे. याशिवाय देवरूखातील श्रीकांत जोशी यांच्याही घरी याच दिवशी गणरायाचे आगमन होणार असून याही उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे.

गेली ३७५ वर्षे या उत्सवाची ही परंपरा कायम आहे. हिंदू धर्मात सर्वच ठिकाणी गणेशाच्या मूर्तीची भाद्रपद शुद्ध चतुर्थीला प्रतिष्ठापना होते. श्रीकांत जोशी आणि चौसोपी वाड्यातील गणेशोत्सवाला शुद्ध प्रतिपदेला सुरवात होते.

त्यामुळे या उत्सवाने कोकणातील गणेशोत्सवाची सुरवात होते.गेल्या वर्षी कोरोनामुळे हे दोन्ही उत्सव अत्यंत साधेपणाने साजरे झाले होते. या वर्षीही पोलिसांच्या सूचनेनुसार कोरोनाचे सर्व नियम पाळूनच हे उत्सव साजरे केले जाणार आहेत. ७ तारखेला सकाळी या दोन्ही मूर्तींचे आगमन होणार आहे.

संबंधित पोस्ट

पोलीस भरती परीक्षेतील मोठा गैरव्यवहार उघड होण्याची येण्याची शक्यता प्रीतिश देशमुखच्या घरी सापडले कागदपत्र आरोग्य, म्हाडा, टीईटीनंतर धक्कादायक गोष्टी समोर संशयाच्या भोवऱ्यात..

vishwatmaklokswamivarta

विशेष वृत्त :-राज्यात ९.७ कोटी मतदार;  पुण्यात सर्वाधिक; पाच जिल्ह्यांमध्ये महिला मतदारांची संख्या अधिक…

vishwatmaklokswamivarta

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आगरतळा (त्रिपुरा) येथे वास्तूशास्त्रविषयक संशोधन सादर …साधना करून वास्तूदोषांचा हानीकारक प्रभाव कमी करा ! – राज कर्वे, ज्योतिष विशारद आणि वास्तूशास्त्र अभ्यासक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय 

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन २०२२-२३सुधारित नियमावली नुसार अर्ज सादर करण्याचे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

संभाजीनगरच्या देवगिरी किल्ल्यातील भारतमातेचे मंदिरात पुरातत्त्व विभागाने पूजेस बंदी केल्याचे प्रकरण !मंदिरात पूजेला बंदी घालण्याचा निर्णयाचा ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त निषेध ! – पूजा बंदीचा निर्णय मागे न घेतल्यास हिंदुत्वनिष्ठ मंदिरात घुसून आंदोलन करणार – हिंदू जनजागृती समिती