vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

जनतेचं आरोग्य महत्वाचं, उत्सव नंतरही साजरे करू, मुख्यमंत्र्यांचं आवाहन.

: जनतेचं आरोग्य महत्वाचं, उत्सव नंतरही साजरे करू, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

[ मुंबई प्रतिनिधी : गेल्या काही दिवसात राज्यात कोरोना संसर्गात काहीशी वाढ होताना दिसत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना आवाहन केलं आहे. गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा ,मोर्चे त्वरित स्थगित करावेत, इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत राहून साजरे करू शकता, मात्र आता आपल्याला मुळात तिसरी लाट येऊच द्यायची नाही, जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या, असं कळकळीचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परत एकदा केलं आहे.

राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सरकारला या संकटाशी सामना करण्यासाठी संपूर्ण तयारीत राहण्याच्या स्पष्ट सूचना आहेतच, पण सत्ताधारी, विरोधी अशा सर्वच पक्षांना मी आवाहन करीत आहे की, आता अधिक काळजी घ्या. गर्दीचे कार्यक्रम टाळा. सण, उत्सव आले आहेत, त्यावर निर्बंध लावावेत असं कोणाला वाटेल? पण शेवटी आपले आरोग्य, प्राण महत्त्वाचे, उत्सव नंतरही साजरे करू, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही

‘हे उघडा ते उघडा’ या मागण्या ठीक आहेत, पण त्यातून धोका वाढला आहे. प्रत्येकाने नियम आणि मर्यादा पाळल्या तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही. म्हणूनच माझ्या शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांना मी विनम्र आवाहन करीत आहे, आपण सगळ्यांनीच शहाणपणाने वागून लोकांच्या जिवाचे रक्षण करायला हवे. सण, उत्सव आज झाले नाहीत तर उद्या नक्की येतील, पण घरातला प्रत्येक माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. लोकांच्या जिवावरील विघ्न टाळायचे असेल तर, शासनाने वेळोवेळी आखून दिलेल्या आरोग्याच्या नियमांचे पालन होईल हे काटेकोरपणे पहा, गर्दी करू नका. सार्वजनिक कार्यक्रम टाळा. राजकीय सभा, संमेलनांना उत्तेजन देऊ नका, हीच त्या विघ्नहर्त्या श्री गणेशाची इच्छा असेल.

मला वारंवार आपणांस हे आवाहन एवढ्याचसाठी करावे लागते आहे, कारण कोविड परत वाढतोय. येणारे दिवस आव्हानात्मक असतील आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नसेल तर विशेषतः सर्व राजकीय पक्षांवर त्याची प्रमुख जबाबदारी आहे, असंही मुख्यमंत्री यांनी म्हटलं आहे.

दुसऱ्या लाटेची सुरुवात कशी झाली त्याची सर्वांनाच पूर्ण कल्पना आहे. या लाटेत ऑक्सिजनचा मोठा तुटवडा होऊन बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाला देखील यातून जावेॉं लागलं होतं.

महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. कोरोनाने जोरदार धडक द्यायला सुरुवात केलीय. अमेरिकेत तिसऱ्या लाटेत जीवन अत्यावस्त केले. चीनही विळख्यात सापडलाय. आपल्या देशातच केरळ राज्यात रोज 30,000 नवे रुग्ण समोर येत आहेत. हा धोक्याचा इशारा आहे व तो आपण सगळ्यांनी गांभीर्याने घेतला नाही, तर महाराष्ट्राला जनजीवनाची फार मोठी किंमत चुकवावी लागेल. सरकार सुविधा निर्माण करील, पण त्याचा वापर करण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रयत्न करा असंही आवाहन मुख्यमंत्री केलं आहे.

संबंधित पोस्ट

खाणीच्या दहा किलोमीटर परिसरातीलभूजल पातळीबाबत वेगळे सर्वेक्षण करणार- खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई

चलो इंडिया’ अनिवासी भारतीयांसाठी जागतिक अभियान.

महाराष्ट्रातील शेतकरी त्रस्त पण एकनाथ शिंदे सरकार प्रचारामध्ये व्यस्त असल्याची टीका अजित पवार विरोधी पक्ष नेते यांनी केली

vishwatmaklokswamivarta

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते15 सप्टेंबर रोजी आभासी पध्दतीने होणार संविधान मंदिराचे उद्घाटन..

vishwatmaklokswamivarta

मराठा आरक्षण मिळणे शक्य नाही, महाराष्ट्र नवनिर्माण सत्तेत आल्यास प्रत्येकाला रोजगार ,महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे

vishwatmaklokswamivarta

भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन**महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण*

vishwatmaklokswamivarta