vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

देशभरातील,देवस्थानशी संबंधित जमिनीची मालक त्या मंदिरात स्थापित देवताच

,देवस्थानशी संबंधित जमिनीची मालक त्या मंदिरात स्थापित देवताच,मंदिराच्या जमिनीची देवताच ‘स्वामी’

नवी दिल्ली प्रतिनिधी   ः ‘देवस्थानशी संबंधित जमिनीची मालक त्या मंदिरात स्थापित देवताच असून पुजारी नेमणूक केवळ पूजा करण्यासाठी व मंदिराच्या मालमत्तेची देखभाल करण्‍यासाठी आहे,’ असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. महसूल नोंदीतून पुजाऱ्यांचे नाव हटविण्याचा आदेशही दिला.

मंदिराशी संबंधित संपत्तीची पुजाऱ्यांनी बेकायदा विक्री करू नये, यासाठी महसूल नोंदणीतून पुजाऱ्याचे नाव हटवावे व संपत्तीचे संरक्षण करावे, असे आदेशपत्र मध्य प्रदेश सरकारने जारी केले. त्यावर पुजाऱ्यांनी आक्षेप घेत त्यांना भूस्वामित्व हक्क दिले असून कोणत्याही आदेशाने ते हिरावून घेता येणार नाही, असे पुजाऱ्यांचा दावा आहे. उच्च न्यायालयाने सरकारचा आदेश फेटाळला आहे. त्यावर मध्य प्रदेशने सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली असून त्यावर आज न्या. हेमंत गुप्ता आणि न्या. ए. एस. बोपन्ना यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. मंदिराच्या मालमत्तेची देखभाल करण्यासाठीच पुजाऱ्यांकडे जमिनीचे हक्क असतात. या जमिनीची मालकी त्यांच्याकडे नसून मंदिरातील देवता ‘भूस्वामी’ असते, असा निर्णय दिला.

न्यायालय म्हणाले…पुजारी हा देवस्थानच्या जमिनीचा काश्‍तकार किंवा सरकारचा आणि सामान्य भाडेकरू नसतोदेवस्थानच्या जमिनीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी फक्त त्याच्याकडे असतेपुजारी किंवा व्यवस्थापन समिती केवळ सेवक असेल, मालक नाही

संबंधित पोस्ट

मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्त्तेचा होणार चपलख वापर- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे राज्य सरकारचा ‘मार्वल’ कंपनी समवेत सामंजस्य करार

वसुलीचे आदेश देशमुखांनी दिले नाहीत;वाझेचा चांदीवाल आयोगापुढे जबाब

vishwatmaklokswamivarta

दैनिक सनातन प्रभात’चा रौप्य महोत्सवी वर्धापनदिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न ! ‘सनातन प्रभात’ नेहमीच काळाच्या पुढे राहिले आहे ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 11 :30 वा करणार ‘मन की बात’, ‘या’ मुद्द्यांवर करू शकतात चर्चा

vishwatmaklokswamivarta

पक्षकारांच्या न्यायासाठी नवोदित वकिलांनी सतत अध्ययन करावे -न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे जुन्नर येथील जुन्या न्यायालयाच्या इमारतीचा विकास आराखडा तयार करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य  पोलिस भरतीसाठी प्रथम मैदानी चाचणी! डिसेंबरनंतर 13 हजार भरती 

vishwatmaklokswamivarta