vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्र सरकारच्या वतीने बेकायदेशीरपणे अटक बाबत चर्चा ,नारायण राणे आज अमित शहांची भेट घेणार?

महाराष्ट्र सरकारच्या वतीने बेकायदेशीरपणे अटक बाबत चर्चा ,नारायण राणे आज अमित शहांची भेट घेणार?

– मुंबई प्रतिनिधी  मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे  आज केंद्रीय गृह मंत्री अमित शहा  भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. जन आशीर्वाद यात्रेदरम्यान महाराष्ट्र सरकारच्या वतीने बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली, असे नारायण राणेंचे म्हणणे आहे. या संदर्भातच नारायण राणे अमित शहा यांची भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

आज दुपारी केंद्रीय गृह मंत्रालयात ही भेट होणार असल्याची माहिती आहे. केंद्रीय मंत्र्यावर बेकायदेशीर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर केंद्र सरकारने कारवाई करावी अशी मागणी नारायण राणे करणार आहेत.

मागच्या महिन्यात जनआशीर्वाद यात्रे दरम्यान कोकणात असताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर पोलिसांनी नारायण राणे यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले होते. ज्या दिवशी त्यांना अटक झाली. त्याचदिवशी त्यांना जामीनही मिळाला होता

नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. शिवसेनेने ठिकठिकाणी नारायण राणेंविरोधात हिंसक आंदोलनं केली होती. नारायण राणेंच्या जुहू बंगल्याबाहेर शिवसैनिक आणि राणे समर्थक भिडले होते.

संबंधित पोस्ट

राज्यातील विमानतळांच्या प्रश्‍नांवर संयुक्त बैठक घेऊ – ज्योतीरादित्य शिंदे…

vishwatmaklokswamivarta

देशाच्या महासत्ता होण्याच्या वाटचालीत महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राचा मोलाचा वाटा असणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानातील तीन उपक्रमांची गिनीज बुक मध्ये नोंद

परभणीत परिवर्तन होणार : महादेव जानकर घनसावंगीतून आघाडीवर राहणार,भाजपा नेते सतीश घाटगे यांचा विश्वास

आता पण सत्तेत नाही आणि भविष्यात देखील सत्तेत राहायचं नाही. मला सत्तेत राहण्यासाठी शुभेच्छा देऊ नका. पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी

vishwatmaklokswamivarta

पर्यावरणीय उल्लंघन प्रकरणी पडताळणीनंतरजेएसडब्ल्यू कंपनीवर नियमानुसार कारवाई करणार- पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे

विद्युत रोषणाई आपणास १८ ते २३ ऑक्टोबर, २०२५ पर्यंत सायंकाळी ६:३० ते मध्यरात्री १२ पर्यंत पाहता येईल.

vishwatmaklokswamivarta