vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

छेडछाडीविरोधात आता तातडीने मिळणार पोलीस संरक्षण-महिला सुरक्षेसाठी ‘शी-बॉक्स’ पोर्टलचे अद्ययावतीकरण

छेडछाडीविरोधात आता तातडीने मिळणार पोलीस संरक्षण-महिला सुरक्षेसाठी ‘शी-बॉक्स’ पोर्टलचे अद्ययावतीकरण

अहिल्यानगर , प्रतिनिधी- कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी महिला एवं बाल विकास मंत्रालय मार्फत कार्यान्वित करण्यात आलेल्या ‘शी-बॉक्स’ (SHe-Box) या ऑनलाइन प्रणालीची व्याप्ती आता लक्षणीयरीत्या वाढविण्यात आली आहे. अद्ययावत करण्यात आलेल्या या पोर्टलद्वारे महिलांना आता केवळ कार्यस्थळावरील छळच नव्हे, तर सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या छेडछाड, शेरेबाजी किंवा रस्त्यावरील उपद्रवी प्रकारांविरोधातही थेट तक्रार नोंदवता येणार आहे.

पूर्वी ‘शी-बॉक्स’ पोर्टलचा वापर प्रामुख्याने ‘कार्यस्थल पर महिलाओं का यौन उत्पीड़न (रोकथाम, निषेध एवं निवारण) अधिनियम, २०१३’ अंतर्गत तक्रारींसाठी मर्यादित होता. मात्र, नव्या अद्ययावतीकरणामुळे महिलांच्या सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीनेही हे पोर्टल (https://shebox.wcd.gov.in) प्रभावी ठरणार आहे.

शी-बॉक्स’ ही केंद्र सरकारची एक एकात्मिक तक्रार नोंद प्रणाली असून, ती सरकारी, खासगी तसेच असंघटित क्षेत्रातील महिलांसाठी खुली आहे. या पोर्टलवर तक्रार नोंदवल्यानंतर ती संबंधित आंतरिक समिती किंवा स्थानिक समितीकडे स्वयंचलितपणे पाठवली जाते. देशभरातील मंत्रालये, विभाग, जिल्हे आणि पोलीस यंत्रणांशी डिजिटल जोडणी, नोडल अधिकाऱ्यांमार्फत तक्रारींचे निरीक्षण, ९० दिवसांच्या कालावधीत चौकशी पूर्ण करण्याची तरतूद, तक्रारदाराची गोपनीयता पूर्णपणे सुरक्षित ठेवणे आणि प्रकरणांच्या प्रगतीवर ऑनलाइन लक्ष ठेवण्याची सुविधा ही या पोर्टलची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

महिलांना अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाइन तक्रार नोंदवता येते. पोर्टलवर जाऊन “Register Your Complaint” पर्याय निवडावा, मोबाईल क्रमांक नोंदवून OTP द्वारे लॉगिन करावे, त्यानंतर स्वतःची माहिती, कार्यस्थळ किंवा घटनास्थळ, छळाचा प्रकार आणि आरोपीची माहिती भरावी. आवश्यक असल्यास पुरावे अपलोड करून तक्रार सबमिट केल्यानंतर रेफरन्स नंबरद्वारे स्थिती ट्रॅक करता येते. जर संबंधित संस्थेची IC नोंदणीकृत नसेल, तर तक्रार आपोआप जिल्हा किंवा राज्य स्तरावरील समितीकडे पाठवली जाते.अद्ययावत प्रणालीमुळे तक्रार प्राप्त होताच संबंधित परिसरातील पोलीस ठाण्याला तातडीने माहिती पाठवली जाते. त्यामुळे प्रशासकीय विलंब टळून पोलिसांकडून त्वरित मदत मिळणे आणि संशयितांवर कायदेशीर कारवाई करणे शक्य होते.

तक्रार नोंदविल्यानंतर पोर्टलवर लॉगिन करून “Track Your Complaint” विभागात जाऊन रेफरन्स नंबर, मोबाईल किंवा ईमेल वापरून तक्रारीची सद्यस्थिती, चौकशीची प्रगती आणि निकाल पाहता येतो. ईमेल व एसएमएसद्वारेही अद्ययावत माहिती मिळते.

‘शी-बॉक्स’ पोर्टल हे सुरक्षित आणि सन्मानजनक कार्यपरिसर निर्माण करण्यासाठी तसेच सार्वजनिक ठिकाणी महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचे साधन ठरत आहे. डिजिटल यंत्रणेमुळे तक्रारींचे जलद निपटारा, पारदर्शकता आणि जबाबदारी वाढण्यास मदत होत आहे

महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने ‘शी-बॉक्स’ पोर्टल अधिक सक्षम केले आहे. महिलांनी या सुविधेचा प्रभावी वापर करून छळाविरोधात पुढे यावे. तक्रार प्राप्त होताच पोलिसांकडून तात्काळ मदत उपलब्ध करून दिली जाईल,” असे आवाहन महिला व बालविकास अधिकारी संजय कदम यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

उद्योगांना पोषक वातावरण निर्मितीवर भर द्यावा-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

vishwatmaklokswamivarta

लंबित प्रस्तावांना8 डिसेंबरपूर्वी प्रशासकीय मान्यता घ्या- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- पायाभूत सुविधांच्या कामांकरिता युनिक आय डी क्रमांक मिळवण्यासाठी तातडीने कार्यवाही करा.

vishwatmaklokswamivarta

टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयामध्ये सामंजस्य करार ४५ आयटीआयमध्ये सुसज्ज प्रयोगशाळांची उभारणी; ८ हजार विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी

vishwatmaklokswamivarta

मिरज तालुक्यातील 8 पाणंद, शिवरस्ते झाले अतिक्रमणमुक्त- 7.5 कि.मी. लांबीचे एकूण 8 रस्ते अतिक्रमणमुक्त झाल्याने 750 शेतकऱ्यांना मिळणार लाभ 

विकसित कृषी संकल्प यात्रा’शेतकऱ्यांमध्ये कृषी तंत्रज्ञानाची जनजागृती करणार

जात प्रमाणपत्र पडताळणी कडून विशेष मोहिमेचे आयोजन  

vishwatmaklokswamivarta